झाडगाव -विडुळ मेंन रोडवर पडले बाभळीचे मोठे झाड.

youtube

झाडगाव-विडुळ मेंन रोडवर पडले बाभळीचे मोठे झाड….
भर पावसात नागरिकांचे हाल वाहतूक कोंलमडली
उमरखेड

उमरखेड तालुक्यातील झाडगाव ते विडुळ मेंन रोडवर मोठे बाबळीचे झाड पडले साधारण सुमारे अडीच ते तीन दरम्यान हे झाड पडले. उमरखेड तालुक्यात आज खूप मोठ्या प्रमाणात पाऊस , वादळी वारा झाल्यामूळे मोठे बाभळीचे झाड पडले व वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.यामुळे उमरखेडला येणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणे हाल झाले. ढाणकी कडे येनारी वाहतूक कोलमडली.भर पावसात नागरिकांचे पावसामुळे बेहाल. पावसाची संतंत धार सुरू असुन छोटे लेकरे घेऊन महिला ऑटो मध्ये बसलेल्या होत्या साधारण साडे तीन पर्यंत मदतीसाठी कोणीही तिथे आले नाही. दुचाकीस्वार व नागरिकांनी आपला रस्ता बाबळीच्या फाट्या मधून काढला व आपली वाहने सरकावली पुढे नेले. उमरखेड कडुन ढाणकीकडे येणारे वाहतुक आपल्या दिशेने निघाली. उमरखेड कडून ढाणकी कडे आपला रस्ता काढुन निघाले नागरिक या ठिकाणी मदतीसाठी अद्याप प्रशासनाचे कुणीही आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!