अंचलेश्वर दुर्गा मंडळातर्फे संगीतमय भजनाचा सामना संपन्न.
अंचलेश्वर दुर्गा मंडळातर्फे संगीतमय भजनाचा सामना संपन्न.
मुळावा
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष्यापासून नवरात्री उत्सव बंद होते. लोकांना घराबाहेर निघणे मुश्किल झाले होते. मात्र आता नवरात्री उत्सव धूमधडक्यात साजरा होत आहे. त्याच अनुषंगाने सुकळी नवीन येथे अंचलेश्वर दुर्गा मंडळातर्फे संगीत भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात हनुमान संगीत भजनी मंडळ वाकद ता. भोकर जि. नांदेड विरुद्ध जय हनुमान संगीत भजनी मंडळ मनूला (खु)ता. हदगांव जि. नांदेड यांचा जंगी सामना संपन्न झाला. दोन दिवसाच्या कार्यक्रमाचा शेकडो लोकांनी आस्वाद घेतला. सुकळी (नवीन )सोबतच तिवरंग, पिंपळदरी, झाडगाव, मुळावा, तरोडा या गावातील नागरिक कार्यक्रम ऐकण्यासाठी होते.हनुमान भजनी मंडळ च्या उशाताई वाकदकर व जय हनुमान भजनी मंडळ च्या सोनूताई हुंबे यांनी आपल्या मधुर आवाजाने उपस्थिताना मंत्रामुग्ध केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंचलेश्वर दुर्गामहिला मंडळ सोबतच गावातील विश्वनाथ चंद्रवंशी, किसन शंकरराव चंद्रवंशी, बाळासाहेब सूर्यवंशी (मनुलकर )पंजाब शिंदे, नामदेव चंद्रवंशी, कैलासराव चंद्रवंशी, बळवंत शिंदे, संतोष चव्हाण,अशोक गुलाबराव चंद्रवंशी, लक्ष्मण चंद्रवंशी, विलास चंद्रवंशी, पांडुरंग चंद्रवंशी, दत्ता चंद्रवंशी, विठ्ठल बाबुराव चंद्रवंशी, अविनाश सूर्यवंशी, सिद्धार्थ कांबळे, ओमा चंद्रवंशी,नितीन चंद्रवंशी,वैभव चंद्रवंशी सह गावातील तरुणांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमला गावातील महिला सह तरुण, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.