ग्राहकांनी नेहमी अत्यंत जागरूक राहणे आवश्यक – अँड विलासराव देवसरकर

youtube

ग्राहकांनी नेहमी अत्यंत जागरूक राहणे आवश्यक
– अँड विलासराव देवसरकर

उमरखेड

ग्राहकांनी नेहमी कोणत्याही प्रकारच्या वस्तू खरेदी करताना अत्यंत जागरूकपणे राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अभा ग्राहक पंचायत चे तालुकाध्यक्ष अँड विलासराव देवसरकर यांनी केले अँड विलासराव देवसरकर हे स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्राहक दीन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार प्रशांत कावरे प्रमुख म्हणून तर ग्राहक पंचायत चे पदाधिकारी प्रा प्रकाश देशमुख ‘ अमोल कवाने ‘ दत्ता गंगासागर ‘ माजी गटविकास आ.सुभाष पांडे अँड राजेश्वर रायवार ‘ सविता पाचकोरे ‘ भारत कुलकर्णी ‘ राजेश गांजेगावकर हे ग्राहक पंचायत चे पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती देवीचे पूजन करण्यात आले सर्वप्रथम जागो ग्राहक जागो असे कवितेचे वाचन मुटकुळे यांनी केले पुढे अँड देवसरकर म्हणाले की ग्राहकांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी दक्ष असले पाहिजे काही तक्रार करावयाची असल्यास स्थानिक ग्राहक पंचायत सदैव तयार असल्याचे सांगून ग्राहकांनी जागृत असल्यास न्याय मिळतोच असेही ते म्हणाले ग्राहकांच्या अनेक ठिकाणी फसवणूक होते परंतु आपण मात्र ‘ |जाऊ द्या “असे म्हणून सहानुभूती दाखवतो व तक्रार करणे टाळतो त्यामुळे अनेक वेळा स्वतःचे नुकसान होते तेव्हा ग्राहकांनी तक्रार करून न्याय मिळवून घ्यावा सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल त्यांच्यावर होणारा अन्याय कसा दूर करता येईल यासाठी ग्राहक पंचायत सदैव प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अमोल कवाणे यांनी प्रास्ताविकात ग्राहक पंचायत चे कार्य तसेच ग्राहकांच्या अधिकार याबाबत माहिती दिली तर प्रा. प्रकाश देशमुख यांनी शासनाने सुद्धा जागो ग्राहक जागो चा नारा दिला असून सन 1986 यावर्षी हा कायदा करण्यात आला असून त्यामध्ये कायद्यात शिक्षेची तरतूद नसल्यामुळे त्यानंतर नऊ ऑगस्ट 2019 रोजी शिक्षेच्या तरतुदीसह कायदा करण्यात येऊन पुढे 20 जुलै 2020 रोजी हा कायदा अमलात आल्याची त्यांनी सांगितले तर माजी गट विकास अधिकारी सुभाष पांडे यांनी या कायद्यान्वये अनेक .ठिकाणी ग्राहकांच्या वतीने झालेले निर्णय याबाबत चे न्यायनिवाडेच वाचून दाखवले तर दत्ता गंगासागर यांनी स्वतः ग्राहक असल्यामुळे त्यांनी सुद्धा काही वस्तूची खरेदी केल्या होत्या त्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्याबाबतची तक्रार करून न्याय मिळवून घेतले असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींनी सातबाराचे उतारे ‘ भूमी अभिलेख मधील नकाशा तसेच स्टँप घेताना दहा टक्के रक्कम आगाऊ घेतली जाते या बाबतच्या तक्रारी केल्या तर दहा टक्के रक्कम घेत असल्याबाबत स्टॅम्प पेपर घेताना दहा टक्के अतिरिक्त रक्कम घेतल्या जात असल्याबाबत ग्राहक पंचायत च्या वतीने अँड विलासराव देवसरकर यांनी नायब तहसीलदार प्रशांत कावरे यांना यावेळी निवेदन देण्यात आले ग्राहक पंचायत च्या वतीने हे ग्राहकांचे शोषण आहे त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करावी असेही त्यांनी यावेळी सांगुन हे ग्राहकांचे शोषण थांबवावे असेही ते म्हणाले कार्यक्रमाचे संचालन संदीप घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार प्रशांत कावरे यांनी केले

Google Ad
Google Ad

1 thought on “ग्राहकांनी नेहमी अत्यंत जागरूक राहणे आवश्यक – अँड विलासराव देवसरकर

  1. I loved even more than you will get done right here. The picture is nice, and your writing is stylish, but you seem to be rushing through it, and I think you should give it again soon. I’ll probably do that again and again if you protect this walk.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!