अतिवृष्टीबाधितांना शासनातर्फे भरीव निधीची मदत करण्यात येणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
अतिवृष्टीबाधितांना शासनातर्फे भरीव निधीची मदत करण्यात येणार -कृषी मंत्री अब्दुल सत्तार
एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही
उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतीची पाहणी
उमरखेड
दि.२०: अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे भरीव निधीची मदत करण्यात येईल व एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज यवतमाळ येथे दिली. उमरखेड तालुक्यातील सुकळीच्या वरुड-बीबी फाट्यावरील नागेशवाडी आणि मारलेगाव येथे अतिवृष्टीमुळे बाधित शेतीची कृषी मंत्री यांनी आज पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठीच मी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
खरडून गेलेल्या शेतीसोबतच, घरांचे, गुरेढोरे व जीवित हानीचे नुकसान झालेल्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
माहे जुलै अखेरपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येईल असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
ना. सत्तार यांनी नागेश वाडी येथील शेतशिवारात झुणका भाकरीचा आस्वाद घेतला. याप्रसंगी आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख व गोपाल अग्रवाल सोबत होते
तत्पूर्वी यवतमाळ येथे अण्ण व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी कृषिमंत्री यांची भेट घेऊन त्यांना यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार आनंद देऊळगावकर, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, लोकसेवक, सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?