विडूळ प्राथमिक आरोग्य केंन्द्रात सावळागोंधळ .. आरोग्य केंद्राच्या प्रतीक्षालयातच झाली महिलेची प्रसूती.

youtube

विडूळ प्राथमिक आरोग्य केंन्द्रात सावळागोंधळ ..

आरोग्य केंद्राच्या प्रतीक्षालयातच झाली महिलेची प्रसूती…

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचे दुर्लक्ष तर वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित

आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणा मुळे शेवटी बाळ दगावले…

उमरखेड/ प्रतिनिधी –
उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून विडुळ या प्राथमिक आरोग्य केंद्राची ओळख आहे परिसरातील 15 गावातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी ईथेच येत असतात कधीकाळी पुरस्कार प्राप्त असलेल्या या केंद्राची आज मात्र दयनीय परिस्थिती झाली आहे
शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी विडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विडुळ पासून जवळच असलेल्या टाकळी येथील शुभांगी सुदर्शन हापसे(२१) ही गरोदर महिला आपल्या माहेरी प्रसुती करिता आली होती यावेळी तिचे वडील माधव सावतकर तिच्या सोबत होते मात्र त्याठिकाणी कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने त्या गर्भवती महिलेची प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रतीक्षालयातच होऊन नवजात बाळ दगावल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता चे दरम्यान घडली असून या निष्काळजीपणा मुळे सर्वत्र रोष व्यक्त केल्या जात आहे
आरोग्य केंद्रातील ओपीडी संपल्यानंतर रुग्णालयात कोणीच थांबत नसल्याचे तेथील नागरिकांनीही यावेळी संताप व्यक्त करत सांगितले

जन्मजात बाळाचे वजन कमी असल्यामुळे
सदर घटना घडली असावी
मी आजारी असल्यामुळे यावेळी सुट्टीवर होतो अशाही परिस्थितीत मी आरोग्य केंद्रात त्वरित उपस्थित झालो..
डॉ विष्णूकांत शिवणकर
वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र विडुळ तालुका उमरखेड चौकट : खा. सुभाषराव वानखेडे यांना भ्रमन ध्वनिवर संपर्क शिवसेनेचे उपतालुका प्रमुख निलेश जैन यांनी करुण झालेल्या घटनेची माहीती दिली प्रशासनाला मा. खासदार यांनी धारेवर धरले स्थानिक गैरहजर राहण्यावर तात्काळ कार्यवाही करा.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!