ढाणकीत समूह राष्ट्रगीत गायनाचा रेकॉर्ड. ७ हजार विद्यार्थ्यासह १५ हजार जणांनी गायले एकाच वेळी गायले समुह राष्ट्रगीत.

youtube

ढाणकीत समूह राष्ट्रगीत गायनाचा रेकॉर्ड. ७ हजार विद्यार्थ्यासह १५ हजार जणांनी गायले समुह राष्ट्रगीत..

ढाणकी.. स्वराज्य सप्ताह अंतर्गत पोलीस स्टेशन बिटरगाव नगरपंचायत ढाणकी व व्यापारी महासंघ ढाणकी यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने बस स्थानक परिसर येथे करण्यात आले होते या समूह राष्ट्रगीत गायनात तब्बल १६ शाळेतील सात हजार विद्यार्थ्यांनी व ढाणकीतील आठ हजार नागरिकांनी असा एकूण पंधरा हजार जणांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी आपला सहभाग नोंदवून ढाणकीत समूह राष्ट्रगीत गायनाचा एक रेकॉर्ड केला आहे.
यामध्ये कस्तूरबा गांधी कन्या विद्यालय, गुलाबसिंह ठाकुर प्राथमिक शाळा, संत गाडगेबाबा आश्रम शाळा, विमुक्त जाती भटक्या जमाती अश्रम शाळा , स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय, ज्ञानज्योती इंग्लिश मिडीयम स्कूल, हनीफ मास्टर उर्दू स्कूल, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, जि.प. उच्च प्राथमिक शाळा आठवडी बाजार, जि.प.माध्यमिक शाळा टेंभेश्वर नगर, जि.प. प्राथमिक शाळा टेंभेश्वर नगर, मातोश्री चंद्रभागाबाई इंग्लिश मीडियम स्कूल, जि.प.उर्दू शाळा टेंभेश्वर नगर, मधुकरराव नाईक मूकबधिर विद्यालय, स्व. थावराजी नाईक दिव्यांग विद्यालय या शाळेतील तब्बल सात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला राष्ट्र गीत गायनासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यभागी भव्य दिव्य असा स्टेज उभारण्यात आला होता. गांजेगाव, उमरखेड, बिटरगाव, स्टेट बँक या चारही रस्त्यावर विद्यार्थ्यांचं व राष्ट्रगीत गायनासाठी आलेल्या आठ हजार नागरिकांच शिस्तबद्ध अस नियोजन करण्यात आलं होतं. समस्त ढाणकी वासियांनी व दोनशे स्वयंमसेवकांनी स्वतः पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. प्रचंड गर्दी व मुख्य रहदारीच्या रस्त्यावर कार्यक्रम सुरू असूनही बिटरगाव पोलिसांनी रहदारीची चांगली पर्यायी व्यवस्था केल्याने कार्यक्रमांमध्ये कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नागेश महाजन, प्रास्ताविक संजय भोसले तर आभार प्रदर्शन ठाणेदार प्रताप भोस यांनी केले.

Google Ad
Google Ad

1 thought on “ढाणकीत समूह राष्ट्रगीत गायनाचा रेकॉर्ड. ७ हजार विद्यार्थ्यासह १५ हजार जणांनी गायले एकाच वेळी गायले समुह राष्ट्रगीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!