नागरिकांनी ग्रामीण आवास योजनेचा सर्वे करून घ्यावा. — जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचे आवाहन.

नागरिकांनी ग्रामीण आवास योजनेचा सर्वे करून घ्यावा.
— जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचे आवाहन.
उमरखेड – सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत कुणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये तसेच भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी गायरान, गावठाण जमिनी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसतील तर लाभार्थ्याला जागा खरेदीसाठी एक लाख रुपये दिले जातील. तरी ज्यांना आत्तापर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा प्रपत्र ड यादीत नाव नाही त्यांनी घरकुलाचा सर्वे करण्याची शेवटची तारीख 15 मे पर्यंत असून घरकुलाचा सर्वे ग्रामसेवक यांच्या मार्फत करून घ्यावा असे आवाहन जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केले आहे.