हायवेला जोडणारे पांदण रस्ते दोन दिवसात व्यवस्थित करा आमदार ससाने.

youtube

हायवेला जोडणारे पांदन रस्ते दोन दिवसात व्यवस्थीत करा- आमदार ससाने

उमरखेड…..

१८ : – शहरातील जोड रस्त्यावर पडलेले खड्डे सिमेंट कॉक्रीटने बुजविने , हायवेच्या दोन्ही बाजुने नाल्या काढून शेतकऱ्यांच्या शेतात घुसलेले पाणी काढून देणे, व हायवेला जोडणारे पांदन रस्ते दोन दिवसात व्यवस्थीत करून देण्याच्या सुचना तसेच पाणी शेतात घुसून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई हायवेने करून देण्याच्या सुचना हायवे अधिकारी विजय राठोड यांना नगराध्यक्ष तथा आमदार नामदेव ससाने यांनी दिल्या . ते नगरपरीषद उमरखेड येथे आयोजित बैठकीत बोलत होते . दि १७ जुन रोजी नगराध्यक्ष दालन नगरपरीषद उमरखेड येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजीत करण्यात आली होती . या बैठकीला हायवेचे कंत्राटदार अधिकारी, कर्मचारी, आणी शेतकरी उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!