धार धार (घाव) चाकू घेऊन फिरणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

youtube

धार धार (घाव) चाकू घेऊन फिरणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

उमरखेड
उमरखेडमध्ये अवैधरीत्या घाव (चाकू) बाळगणाऱ्या एका संशयित तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या डी.बी. पथकाने शिताफीने अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील कॉलनीत हा इसम घावासह फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा तत्काळ हरकत घेत कारवाईसाठी रवाना झाली.

दि. 01 जून 2025 रोजी, दुपारी 12 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानासमोरील डांबरी रस्त्यावर संशयित इसम विनायक सायलु हाळदेवार (वय 20, रा. बजरंग कॉलनी, तरोडा बु, ता. जि. नांदेड) यास थांबवण्यात आले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला लाकडी मुठ असलेला, काळ्या टेपने गुंडाळलेला, एकूण 13.9 इंच लांबीचा घाव (चाकू) सापडला. सदर चाकू त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसताना सापडल्याने तो घटनास्थळीच जप्त करण्यात आला.

घावाचे तपशील –
पात्याची लांबी 9.6 इंच, रुंदी 1.5 इंच, मुठीची लांबी 4.3 इंच, मॅन लांबी 10.2 इंच असून संपूर्ण चाकूची किंमत सुमारे ₹200/- असल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर इसमावर उमरखेड पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 अंतर्गत अप.क्र. 406/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सपोनि पांडुरंग शिंदे, डी.बी. प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोना संतोष राठोड, पोशि संघशील टेंभरे, निवृत्ती महाळनर, प्रफुल घुसे व किरण राठोड यांनी सहभाग घेतला.

जनतेस आवाहन :
शहरात अवैध शस्त्रधारकांविरोधात उमरखेड पोलीस कठोर भूमिका घेत असून, अशी कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी. तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Google Ad
Google Ad

16 thoughts on “धार धार (घाव) चाकू घेऊन फिरणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

  1. Very interesting points you have remarked, thankyou for posting. “What is harder than rock, or softer than water Yet soft water hollows out hard rock. Persevere.” by Ovid.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!