बातमी प्रकाशित होताच बरडशेवाळा गावातून जाणाऱ्या रोडवरील बुजवले खाडे.

youtube

बातमी प्रकाशित होताच बरडशेवाळा गावातुन जाणा-या रोडवरील बुजवले खड्डे

बरडशेवाळा ता.१५

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रोडवर पाच हजार लोकसंख्येच्या वर असलेल्या बरडशेवाळा ता.हदगांव येथे रोडलगत शाळा तलाव मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र मध्यवर्ती बँक विद्युत उपकेंद्र असल्याने चौपदरीकरणाच्या कामात राष्ट्रीय महामार्गावर हदगाव ते वांरगा रोडवर फक्त बरडशेवाळा येथे गावाच्या बाहेरून बायपास करण्यात येत आहे.
सध्या वांरगा ते हदगाव रस्त्याचे काम काम सुरू आहे.बरडशेवाळा बायपास रस्ताचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने सर्व मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहतूकीला येण्याजाण्यासाठी गावातुनच जुन्या डांबरीकरण रस्त्यावरून वापर सुरू आहे. या डांबरीकरण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने दररोज छोटे मोठे अपघात होत असताना संबंधित विभाग मात्र झोपेचे सोंग घेतले असल्याने बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
संबंधित विभागाने बातमीची दखल घेऊन गेल्या दोन दिवसांपासून जुन्या डांबरीकरण रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. बायपास अर्धवट अवस्थेत असल्याने नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून जड वाहनासह सर्व वाहतूक गावातील डांबरीकरणावरुन जात असल्याने खड्डे बुजवले असल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असल्याने वाहन धारकासह नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे पण अवजड व मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने खड्डे किती दिवस काम करतील अशा प्रश्न निर्माण होत असल्याने बायपासचे अर्धवट काम लवकर पूर्ण करुन बरडशेवाळा गावातुन पुन्हा नव्याने डांबरीकरण करावे अशी मागणी वाहनधारकासह बरडशेवाळा येथील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!