उमरखेड शहरात माहेश्वरी चौक येथे सकल मराठा आंदोलकाचा रास्ता रोको मराठा आंदोलन पेटण्याचे चिन्ह तब्बल ३ तास चक्का जाम

youtube

   उमरखेड शहर  माहेश्वरी चौक येथे सकल मराठा आंदोलकाचा रास्ता रोको

मराठा आंदोलन पेटण्याचे चिन्ह तब्बल ३ तास चक्का जाम

प्रतिनिधी
उमरखेड : आज पाचव्या टप्याचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने सरकारने विशेष अधिवेशन घेऊन सकल मराठा समाजास १०% आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मंजुर केला आहे परन्तु ते १०% आरक्षण मनोज जरांगे व सकल मराठा समाजाला मान्य नसुन समाजाची दिशाभूल केल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्रभा भर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले उमरखेड तालुक्यात ढाणकी, धानोरा, पळशी ,मरसुळ, नागसवाडी इत्यादी ठिकाणासह उमरखेड शहरात माहेश्वरी चौक येथे तब्बल ३ तास चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवला होता
सरकारने जी अधिसूचना सगेसोयरे नाते गोत्याची अधिसूचना काढली होती त्यावर १६ फेब्रुवारी पर्यन्त हरकती मागवण्यात आल्या होत्या पन सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार या अधिसूचनेचे कायद्यात रुंपातर न करता २०१४ ला आघाडी सरकारने व २०१९ युती सरकारने अनुक्रमे १६ व १३% आरक्षण दिले ते कोर्टात टिकले नाही त्याच धर्तीवर शिंन्दे सरकारने वेगळे १०% आरक्षण दिल आहे हे सकल मराठा समाजाला मान्य नसल्यामुळ तसेच राज्यभरात मराठा आंदोलकाचे गुन्हे मागे घ्यावे ही मागणी मान्य न झाल्यामुळे सकल मराठा समाज तीव्र भावना व्यक्त करीत आहे .

चौकट : छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन शिन्दे सरकारने मराठ्यांचा घात केला सगेसोयरेची अधिसूचना कायदा न करता घटनाबाहय आरक्षण मराठ्यानां दिल हे आरक्षण टिकाऊ नसुन टाकाऊ आहे हे आरक्षण मराठा समाजाला मान्य नाही

संदीप घाडगे
समन्वयक मराठा क्रांन्ती मोर्चा

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!