स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मिडियम स्कूल दहागाव येथे ‘अविष्कार-७’ नृत्याविष्कार जल्लोषात संपन्न

youtube

स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मिडियम स्कूल दहागाव येथे ‘अविष्कार-७’ नृत्याविष्कार जल्लोषात संपन्न

उमरखेड

.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन-अध्यापनाबरोबरच शालेय क्रीडा स्पर्धा,आनंद मेळावा,सांस्कृतिक कार्यक्रम, यांची आवश्यकता असतेच. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तुकाराम रतनलाल अग्रवाल चँरीटेबल ट्रस्ट द्वारा संचालित स्टुडंटस् वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूल तथा टी.आर.अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘अविष्कार ७’ हा २५ वे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ.वेंकट राठोड उपविभागीय अधिकारी उमरखेड तथा उद्घाटक प्रदीप पाडवी डेप्युटी सुप्रिडेंटन ऑफ पोलीस उमरखेड.पालक प्रतिनिधी म्हणून प्रा.विजय गुजरे होते तसेच संस्था अध्यक्ष दर्शन अग्रवाल , उपाध्यक्ष एन. आर. वडे, सचिव नितीन भुतडा, सदस्य डॉ.विलास चिरडे आदी मान्यवर उपस्थित होते.पालकांनी फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा कला क्रीडा यासारख्या इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांना झेप घेण्यास प्रोत्साहित करावे.असे प्रतिपादन यांनी केले कार्यक्रमात संपूर्ण रामायण , तान्हाजी द अनसग वॅारीयर , महाराष्ट्रातील सण व उत्सव , देशभक्ती , वारी गजर माऊलीचा , ऐतिहासिक प्रसंग,सामाजिक उद्बोधन दर्शविणाऱ्या नाटिका तथा मनाला स्पर्श करणाऱ्या भावनिक तसेच हास्याचे फवारे उडवणाऱ्या थीम मधून चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मने जिंकून घेतले.शाळेच्या वर्ग निर्सरीतील ३ वर्षाच्या स्वरा राजेश मेने या चिमुकलीने संपूर्ण इंग्लिश मध्ये सूत्रसंचालन करून मान्यवर तथा पालकांच्या तोंडून लिटिल चॅम्प वर कौतुकाचा वर्षाव झाला.मागील वर्षी शाळेतील वर्ग १० वी मध्ये ९५ % च्या वर गुण घेणाऱ्या ५ विद्यार्थ्यांसह त्याच्या आई-वडिलांचे कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एम.पी.कदम तर संचलन अविनाश घुसे,पल्लवि पराते आणि समारोप ऋषिकेश वड्डे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन संस्था व्यवस्थापक आशिष लासिनकर यांच्या मार्गदर्शनात पार पडले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विकास डोळस तथा सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मिडियम स्कूल दहागाव येथे ‘अविष्कार-७’ नृत्याविष्कार जल्लोषात संपन्न

  1. Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to far added agreeable from you However how can we communicate

  2. I do believe all the ideas youve presented for your post They are really convincing and will certainly work Nonetheless the posts are too short for novices May just you please lengthen them a little from subsequent time Thanks for the post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!