सर्व धर्मियांचे धार्मिक प्रसंग एकत्र करून साजरे व सलोखा कायम वसमतकर मठाचा स्तुत्य उपक्रम.

youtube

सर्व धर्मियांचे धार्मिक प्रसंग एकत्र साजरे करून व सलोखा – वसमतकर मठाचा स्तुत्य उपक्रम.

माहूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती दिनी रमजान निमित्य इफ्तार पार्टी संपन्न !

श्रीक्षेञ माहूर – सुरेखा तळनकर

हल्ली भारत देशाच्या धर्मनिरपेक्षता या धोरणांला तिलांजली देण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न दिल्ली ते गल्ली पर्यंत करीत विविध विषयावरून वादंग निर्माण करून शांतता व सुव्यव्स्थेचा भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सदभावना व सर्वधर्मसमभावाची हत्या करून सविंधानाला आव्हान देण्याचे कट कारस्थान देखील सुरु असल्याने विशेषतः महाराष्ट्र ढवळून निघाला असतांनाच प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरगडावर सर्व धर्मियांचे धार्मिक प्रसंग एकत्र साजरे करून सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने
मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान
इफ्तार पार्टिचे आयोजन आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर मठाचे मठाधीश द.भ.प साईनाथ महाराज वसमतकर यांच्या संकल्पनेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व मुस्लीम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिन्याच्या रोजा निमित्य माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर मठ येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करून सर्वधर्मीय एकात्मतेचा संदेश दिला गेला.

दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी काल ७:०० वा. आनंद दत्तधाम आश्रम माहूरचे मठाधीश द.भ.प साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते भगवान दत्तप्रभू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर मठाधीश द.भ.प साईनाथ महाराज वसमतकर यांनी उपस्थित हिंदू मुस्लीम बांधवाना राष्ट्रीय एकात्मता,बंधुभाव, समता या विषयावर सखोल मार्गदर्शन करून सर्व एकाच परमेश्वराची लेकरे असून भारत देशाच्या संविधानामध्ये सुद्धा कोणत्याही धर्माचा उल्लेख न करता आम्ही भारताचे लोक असा उल्लेख केलेला असल्याने तसेच या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे या राष्ट्रसंताच्या ओळीचे स्मरण करून बाळगिर महाराज स्वच्छता अभियानच्या अनुशंगाने कोरोना संकट काळात आश्रमाच्या वतीने केलेल्या समाजउपयोगी उपक्रमाची माहिती दिली. कोरोना काळात ज्याप्रमाणे बंधुभाव कायम राखून कोरोनावर मात केली त्याप्रमाणे यापुढेही सर्वधर्मसमभाव व एकोपा कायम राखून राष्ट्रीय एकात्मता राखण्याचा संदेश दिला. एकात्मतेच्या मार्गावर अनेक अडथळे येत असले तरी किंचितही न डगमगता बंधुभाव कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी आनंद दत्त आश्रमातून इफ्तार पार्टीच्या निमित्तने हिंदू मुस्लिम शीख इसाई हम सब भाई भाईचा संदेश पेरला गेला असून देशाला सर्व धर्म एकत्र सलोख्याने राहण्याची आवश्यकता आहे.द्वेष, दंग्यांपेक्षा प्रेम आणि सलोखा समाजासाठी महत्वाचा ठरेल,देशात गांधींच्या विचाराने शांतता आणि एकात्मता पुढे गेली पाहिजे असे मत व्यक्त केले.या वेळी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड,नगरसेवक प्रा. विलास भंडारे, नगरसेवक गोपू महामुने, नगरसेवक प्रतिनिधी रणधिर पाटिल,इरफान सय्यद,रफिक सौदागर,अफसर भाई माजी उपनगराध्यक्ष मुनाफभाई,आशु पठाण ओम पाटिल प्रतिक कांबळे दिनेश कोंडे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमित येवतिकर,ज्ञानेश्वर कऱ्हाळे, जयकुमार अडकीने, जेष्ठ पत्रकार नंदू संतान,शिवसेना शहरप्रमुख निरधारी जाधव, निसार कुरेशी, रफिक भाई गाईड ,मुनीरभाई, हनिफ आल्लाबक्ष,करीमशहा, मुनाभाई, राजु सौंदलकर, शेख आयुब, विक्रम राठोड,नबी साब, पत्रकार सरफराज दोसानी, राज ठाकूर, सिद्धार्थ तामगाडगे,महेंद्र वाघमारे, सुरेखा तळणकर आदिसह अनेक हिंदू मुस्लीम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.पाटील यांनी केले तर प्रास्ताविक अनिल सुरोशे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊराव पाटील हडसनीकर, सुधीर जाधव, पंजाबराव माने, नथ्थू भांगे, संतोष पाटील अडकीने, राहुल पाटील, दिलीपराव कोपरकर, गजानन कलाने, गणपत गोरे, पुंडलिक हुंबे, दीपक पाटील शिंदे, आदीसह शिष्य मंडळांनी परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!