नगर परिषद उमरखेड माझी सुंदर अभियानांतर्गत पावसाचे पाणी अडवणे – जमिनीमध्ये जिरवणे सायकल जनजागृती रॅली संपन्न.
नगर परिषद उमरखेड माझी व सुंदर अभियान अंतर्गत पावसाचे पाणी अडवणे व जमिनीमध्ये जिरवणे सायकल जनजागृती रॅली संपन्न.
नगर परिषद उमरखेड माझी वसुंधरा अभियानांतर्गत पावसाचे पाणी अडवणे, जमिनीमध्ये जिरवणे व पाणीबचतीच्या अनुषंगाने (CATCH THE RAIN : WHEREV IT FALLS WHEN IT FALLS )सदर अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे या अभियानाचा प्रचार प्रसिद्धी होऊन लोकसभा प्राप्त व्हावा. याकरिता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील उपक्रमा अंतर्गत दिनांक 15 एप्रिल 2020 सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर सायकल रॅली नगर परिषद कार्यालय परिसर येथून सुवर्णपथ मिरवणूक मार्ग इथून नाग चौक ते गायत्री चौक ते नगर परिषद परिसर येथे सदर सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये सामाजिक संस्थेचे प अधिकारी दीपक ठाकरे ,नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चारुदत इंगोले ,दिलीप भंडारे, न्यानेश्वर खंडारे ,डॉ.व्यवहारे, कार्यलय अध्यक्ष नागेश बावलगावे,गिरिष गारूडी, आशिष राठोड ,सुनील कवडे , पल्लवी रत्ने ,बबलू पळसकर, नितीन राठोड व पद अधिकारी. व अधिनस्थ शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.