महागाई च्या विरोधात काँग्रेसचे धरणे, रास्ता रोको व जेल भरो आंदोलन ( रस्त्यावर टायर जाळून केला मोदी शासनाचा निषेध ).

youtube

महागाई च्या विरोधात काँग्रेसचे धरणे, रास्ता रोको व जेल भरो आंदोलन

( रस्त्यावर टायर जाळून केला मोदी शासनाचा निषेध )

उमरखेड:
केंद्र शासनाने जीवनाशक वस्तूवर लावलेल्या जीएसटी मुळे महागाई भरपूर वाढली असून सामान्य नागरिकांना याचा भुर्दंड सोसावा लागत आहे काँग्रेसने महागाई विरोधात संपूर्ण देशभर आंदोलन उभारले असून आज उमरखेड शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन दिले यावेळी मोदी शासनाचा व त्यांच्याकडून होत असलेल्या अन्यायकारक ईडी कार्यवाहीचा निषेध मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला.धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन व आभार अॅड शिवाजीराव वानखेडे यांनी केले त्यानंतर स्थानिक संजय गांधी चौकात काँग्रेस तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मोदी सरकार च्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तसेच रस्त्यावर टायर जाळून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला त्यानंतर काँग्रेसच्या नेते व कार्यकर्ते मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले .
यावेळी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे ,काँग्रेस कमिटीचे राज्य सरचिटणीस तातूभाऊ देशमुख ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू पाटील चंद्रे , काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे , शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल ,माजी जि प अध्यक्ष रमेशराव चव्हाण , महागाव चे अरुण पाटील शैलेश कोपरकर,युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष युवराज देवसरकर , अॅड शिवाजीराव वानखेडे ,सोनू खतीब , शेख तालीब , युसुफ जनाब , महेंद्र कावळे , श्रीराम बिजोरे ,भैय्या पवार , सचिन घाडगे , वीरेंद्र खंदारे, बाळू अण्णा दुर्गमवार, संजय धोंगडे, चरण डोंगरे,विशाल कोत्तेवार,बालाजी उदावंत,सयद सईद, शाम चव्हाण, अनंत कदम,बिरजू मुडे,दत्ता सुरोशे, सुधाकर लाहेवार,पीसी भोळे,विष्णू मूटकुळे,बिरजू मुडे,विष्णू मूटकुळे,मुसभाई,कान्हा तुपेकर सह तालुक्यातील व शहरातील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

Latest News

*नामंवत तज्ञ डॉ. आलोक गुप्ता स्पेशालिस्ट मुळव्याध व भगंदर तज्ञ यवतमाळ* यांनी दिलेली मुलाखात नारिशक्ती न्युज वर
सबस्क्राईब व लाईक करा चॅनलला
*नारिशक्ती न्युज चँनल*
*सविता चंद्रे मुख्य संपादक*

 

Google Ad
Google Ad

1 thought on “महागाई च्या विरोधात काँग्रेसचे धरणे, रास्ता रोको व जेल भरो आंदोलन ( रस्त्यावर टायर जाळून केला मोदी शासनाचा निषेध ).

  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!