धनगर समाज महिला मारहाण प्रकरणी धनगर समाज युवा मल्हार सेना रस्त्यावर.

youtube

धनगर समाज महिला मारहाण प्रकरणी धनगर समाज युवा मल्हार सेना रस्त्यावर
बीड …
जिल्ह्यामध्ये महिला वरती अत्याचार खूप प्रमाणात वाढलेले आहे त्यातच पुजारी कुटुंबातील दोन महिलांना त्यांच्या गुप्तांगावर बेदम मारहाण करून लाकडी बॅटने मारून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या संदर्भामध्ये या आधी पण पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आलं होतं आणि फरार असलेल्या आरोपी महिलांना अटक करण्यात यावी याची मागणी केली होती अद्यापही फरार असलेल्या आरोपी महिलांची अटक झालेली नाही त्यामुळे धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य व महिला आघाडी बीड यांच्या वतीने तीघाडी सरकारचे श्राद्ध घालून गृहमंत्र्यांना पोस्ट मार्फत बांगड्या पाठवण्यात आल्या यावेळीधनगर समाज युवा मल्हार सेना संस्थापक मनोज सिराम ,सरसेनापती प्रकाश भैय्या सोनसळे ,ॲड संगीताताई धसे,शैलाताई मुसळे, संजीवनी राऊत, मंजुषा खाडे, गंगुबाई कुडके, जयश्री रनशिगें, पुजारी ताई, कुटुंबातील दोन महिला सदस्य होत्या,तसेच विक्रांत हजारी, सर्जेराव तात्या तांदळे साहेेब , विलास बामणे, दत्ताभाऊ परळकर ,अमोल वडतीले, डॉक्टर लक्ष्मण जाधव, भगीरथ बियाणी ,संग्राम बांगर, कपिल सौदा, भालचंद्र कुलकर्णी, राकेश बिराजदार, आणि मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या यावेळी आघाडी सरकारचा जाहीर निषेध श्राद्ध घालून करण्यात आला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!