अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे धरणे आंदोलन उमरखेड.

youtube

अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेचे धरणे आंदोलन.

उमरखेड : –

उमरखेड येथे तहशिल पटांगणात विद्यार्थी नी केले धरणे आंदोलन
राज्य शासनाने सार्वजनिक विद्यापिठ कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम करणारे असून गुणवत्ता ढासळणारे असल्यामुळे राज्य शासनाच्या धोरणा विरोधात अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेने दि . 9 फेब्रुवारी रोजी 11 . 30 ते 2 वाजे पर्यन्त तहसिल परिसरात धरणे दिली व राज्याचे राज्यपालांना तहसिलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले .
महाराष्ट्र राज्य सरकारने 28 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम करणारा बदल केला व विद्यापिठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारीत केला . पवित्र शिक्षण क्षेत्रात राजकिय हस्तक्षेप वाढणार आहे . त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होईल असा आरोप करून अभाविप ने याचा तिव्र निषेध नोंदवित विद्यापिठांच्या स्वायत्ततेवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने डाव साधला असल्याचेही राज्यपालांकडे पाठविलेल्या निवेदनात अभाविपचे जिल्हा संयोजक धिरज शिंदे , नगरमंत्री सौरभ श्रीवास्तव , सहनगर मंत्री वैभव नगरधने , प्रविण मुंदडा, अजय सुरोशे , आदर्श टाक , स्वप्नील शिंदे ,आदेश पळसकर , रुपेश मोडक आदि विद्यार्थी सहभागी झाले होते .

Google Ad
Google Ad

3 thoughts on “अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे धरणे आंदोलन उमरखेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!