ब्रेकिंग न्युज निर्मल ते हैद्राबाद मार्गावर वाहनाला अपघात डॉ. सुरेखा बरलोटा दगावल्या : अन्य तीन जखमी

ब्रेकिंग न्युज निर्मल ते हैद्राबाद मार्गावर वाहनाला अपघात डॉ. सुरेखा बरलोटा दगावल्या : अन्य तीन जखमी
यवतमाळ – यवतमाळ येथील प्रख्त्यात मानसिक रोगतज्ञ डॉ. पियुष बरलोटा यांच्या वाहनाला निर्मल ते हैद्राबाद मार्गावर अपघात होऊन त्यात त्यांच्या सुविज्ञ पत्नी प्रख्यात स्त्रि व प्रसुती रोगतज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा या दगावल्या असून अन्य तीन जन गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दोन वाहनातून डॉक्टर व त्यांच्या मित्रांचे कुटूंब यवतमाळकडे येत असतांना हि दुर्घटना घडली. डॉ. बरलोटा व त्यांचे मित्राचे कुटूंब यवतमाळला परत येत असतांना निर्मल ते हैद्राबाद मार्गावर टोल नाक्यानजीक निर्मलपासून 12 किमोमिटर अंतरावर त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक भ्रष्ट होऊन ते फुटले. त्यामुळे हा अपघात झाला. एमएच 29 बीपी 4200 क्रमांक असलेली हि गाडी अपघातग्रस्त झाली. अपघातानंतर लोक धावले व त्यांनी जखमींना बाहेर काढून निर्मण येथील शासकीय रुग्णालयात पोहोचविले. पुजा पियुष बरलोटा वय 16 तसेच अतिथी वय 18 आणि मिनल वय 40 असे तिघेजन निर्मल येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाकी इतरांना किरकोळ जखमा असल्याचे समजते. हि वार्ता यवतमाळात येताच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. बरलोटा यांचे मित्र निर्मलकडे रवाना झालेत. हैद्राबाद येथील डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. निर्मल येथील शासकीय रुग्णालयात मृतक डॉ. सुरेखा पियुश बरलोटा यांच्या पार्थीवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून रात्री उशिरा हे पार्थिक यवतमाळात पोहोचण्याची शक्यता आहे.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?