उमरखेड नगर परिषदेची चार वर्षापासून प्रलंबित असलेली 78 कोटीची नळ योजना मंजूर.

youtube

उमरखेड नगर परिषदेची चार वर्षापासून प्रलंबित असलेली 78 कोटीची नळ योजना मंजूर

ईसापुर धरणातून ४७ किलोमिटर थेट पाईपलाईन द्वारे येणार पाणी

उमरखेड प्रतिनिधी :

महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत मुंबई येथे मंत्रालयात प्रधान सचिव सोनिया शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठक सोमवारला दि 31 ऑक्टोबर रोजी प्रधान सचिव यांचे दालनात नगर विकास विभाग मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये उमरखेड नगर परिषदेची ४ वर्षा पासून प्रलंबीत असलेली ईसापुर धरणावरून थेट पाईपलाईन द्वारे सुमारे 47 किलोमीटर ची 78 कोटी रुपयाची नळ योजना मंजूर करण्यात आली असे आमदार नामदेव ससाने , व भाजपा जिल्हा अध्यक्ष नितिन भुतडा यांनी आमदार ससाने यांच्या निवास स्थानी आयोजीत पत्रकार परीषदेत सांगीतले .
सन 2018 मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांनी उमरखेड नगर परिषदेचे अंतर्गत येणाऱ्या विविध कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी उमरखेडचे तत्कालीन माजी नगराध्यक्ष व आमदार नामदेव ससाने जिल्हा भाजपचे अध्यक्ष नितीन भुतडा यांनी उमरखेड नगरपरिषदे अंदाजे ७५ हजार असलेली लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा थेट ईसापुर धरणावरून पाईप द्वारे पाणी उमरखेड शहरात आणण्याची सुमारे ७८ कोटी रुपयाची मागणी केली त्यावर देवेंद्र फडणीस यांनी त्यावेळी तत्वतः मंजुरीही दिली होती त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला परंतु आघाडी सरकारमध्ये या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते आता परत नवीन सरकार आल्यानंतर आमदार नामदेव ससाने आणि जिल्हा भाजपा अध्यक्ष नितीन भुतडा यांनी सतत पाठपुरावा केला त्यावर महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठक 31 ऑक्टोबर सोमवारला सकाळी साडेअकरा वाजता मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत उमरखेड नगर परिषदेसाठी सुमारे 78 कोटी रुपयांची ईसापुर धरणावरून थेट फिल्टर प्लन्ट दहागांव पर्यंत ची 47 किलोमीटर अंतर असलेली ही नळ योजना आज मंजूर करण्यात आली यामुळे उमरखेड नगरपालिकेची पुढील पंचवीस वर्षापर्यंत पाणीटंचाईचा विषय संपुष्टात येणार आहे
तसेच उमरखेड शहराचे विविध विकास कामाचे सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत सांगण्यात आले .मागील अडीच वर्ष महाविकास आघाडीची सरकार असताना उमरखेड तालुक्याला एक रूपयाचा ही निधी महाविकास आघाडी सरकारने दिला नसल्याचे सांगण्यात आले .तसेच 30 जून रोजी राज्यात भाजपा व शिवसेना यांची सरकार कार्यरत झाली लगेच 7 जुलै उमरखेड शहरासाठी आमदार नामदेव ससाणे व भाजपा जिल्हाअध्यक्ष भुतडा यांच्या प्रयत्नांमुळे 5 कोटी वीस लाख रुपये शहरातील नाल्या व इतर बाबीसाठी मंजुरी करण्यात आली व शहरात मत्स्य बाजारासाठी 5 कोटी रुपये मंजूर व सांस्कृतिक भवनासाठी 10 कोटी मंजूर करण्यात आला तसेच मरसुळ येते नव उद्यान मंजूर करण्यात आला . उमरखेड शहराच्या या विविध विकास कामाला गती देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार नामदेव ससाने व भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा यांनी आभार मानले .
आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील विविध विकास कामाबद्दल चर्चा करण्यात आली तसेच युवकांच्या रोजगाराबद्दल ही चर्चा करण्यात आली .पत्रकार परिषदेत माजी पाणीपुरवठा सभापती न पा दिलीप सुरते व माजी शिक्षण सभापती न . पा . प्रकाश दुधेवार उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!