महावितरण चा हलगर्जीपणा २६ दिवसात तब्बल चार वेळेस डी.पी जळाला.
महावितरण चा हलगर्जीपणा २६ दिवसात तब्बल चार वेळेस डी.पी जळाला.
(शेतकरी त्रस्त लाखोचे नुकसान )
ढाणकी –
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस आलेला असताना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे २६ दिवसात तब्बल चार वेळेस डी.पी जळाला. याला शेतकऱ्यांची थट्टा समजावी की, अवहेलना प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात पीरंजी येथील भवाळ यांच्या शेतातील डी.पी दि.०१/०१/२०२३ रोजी जळाला होता. त्याबद्दल शेतकऱ्यांनी ऑफिसला पूर्व सूचना दिली गेली होती. ऑफिस मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर एक वर्षाचे बिल भरण्यास सांगितले, १९ शेतकऱ्यांनी ४५०००₹ बिल भरले गेले रीतसर पावत्या ही घेतल्या परंतु चार ते आठ दिवसाच्या फरकाने एकापाठोपाठ एक चार वेळेस डी.पी जळने याला महावितरण चा विश्वविक्रम म्हणावा लागेल असे बोलल्यास वावगे ठरणार नाही. एकापाठोपाठ २६ दिवसात चार डी.पी जळने ही बाब महावितरणच्या लक्षात न येणे म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड म्हनाव की काय ‘ असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे ठाकलेला दिसतो. डीपी जळाला त्यानंतर लगेच आठ दिवसात दुसरा डी.पी जळाला तेव्हा डी.पी वर लोड जास्त आल्यामुळे जळाला ही बाब तेव्हाच लक्षात येणे गरजेचे होते, व लगेच तेथील शेतकऱ्यांसाठी दोन डी.पी देणे गरजेचे होते. ही साधी गोष्ट लक्षात न आल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे पिक नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना बाजार भावा प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, नुकसान भरपाई न दिल्यास सदर शेतकरी आपल्या मुलांबाळासोबत जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरन उपोषणास आपल्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल तसेच पिरंजी येथील भवाळ यांच्या शेतातील डी.पी त्वरित बसून द्यावा अशा आशयाचे निवेदन पीरंजी येथील शेतकऱ्यांनी मा. उपकार्यकारी अभियंता यास निवेदन देण्यात आले आहे.यावेळी उपस्थित शेतकरी साहेबराव भवाळ पुंजाराम वाघमारे, नारायण काळे, शंकर खूपसे, माधवराव बिट्टेवाड, निर्गुण बिट्टेवाड अनंता बिट्टेवाड, तुकाराम बीट्टेवाड ,माधव मेंडके, राजाभाऊ दवणे, मंगल दवणे, सुधाकर दवणे,मारोती मुरमुरे इत्यादी शेतकरी हजर होते.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.