रखरखत्या उन्हाळ्यात उमरखेड शहरातील बसस्थानक तहानलेलेच [प्रवाश्यांची होतय गैरसोय प्रवाश्याच्या खिश्याला कात्री पाण्याअभावी प्रवाश्याचे बेहाल ] उमरखेड :
रखरखत्या उन्हाळ्यात उमरखेड शहरातील बसस्थानक तहानलेलेच
[प्रवाश्यांची होतय गैरसोय प्रवाश्याच्या खिश्याला कात्री पाण्याअभावी प्रवाश्याचे बेहाल ]
उमरखेड :
शहरातील एसटी बस स्थानकातून दिवसाला शेकडो प्रवासी ये जा प्रवास करित असतात मात्र रखरखत्या उन्हात जीवाची लाहीलाही होत असताना येथील बस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय अथवा पाणपोही नसल्याने प्रवाशांच्या घश्याला कोरड पडत आहे. एसटीकडून प्रवाश्यांसाठी विविध योजना आणि सवलतींचा पाऊस येत आहे. मात्र ऐन कडक उन्हाचा पारा वाढतच आहे उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्याने प्रवासामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचा पाणी नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या बस्थानकात अनेक महिन्यापासून पाणी नसल्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल प्रवाश्यांकडून विचारल्या जात आहे.
बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सोयी सुविधा पुरविण्याचे प्रत्यक्ष काम आगार व्यवस्थापकाचे आहे. मात्र या ठिकाणी येथील बसस्थानक आगाराच्या कक्षेत येत नाही का असा सवाल देखील विचारल्या जात आहे. आणखी किती दिवस समस्येला सामोरे जावे लागणार असा संतप्त सवाल प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे.
चौकट :
आगार प्रमुखाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे
पाण्यासाठी प्रवाश्यांच्या खिशाला कात्री
उन्हाळी सुट्या असल्याने हा एसटीच्या हंगामाचा काळ असतो. त्यामुळे बस्थानकात प्रवाशी संख्या वाढली आहे. महिला आणि जेष्ठांसाठीच्या सवलतीमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या वाढली असताना उमरखेड येथील बस्थानकात मात्र पिण्याच्या पाण्याअभावी प्रवाशांची दैना होत आहे. त्यामुळे प्रवाशांना बस्थानकात परिसरातून पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत असल्याने नाहक प्रवाश्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.



