भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी विजय कदम यांची निवड.

youtube

भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी विजय कदम यांची निवड

उमरखेड-

छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी शासकीय रेस्ट हाऊस येथे दिनांक 23-11-23 ला भ्रष्टाचार विरोधी मोर्चा या संघटनेची कार्यकारिणी बैठक गुरुवार रोजी संपन्न झाली प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय राहुलभाऊ गंगावणे साहेब हे उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांनी गंगावणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गंगावणे साहेब यांच्या शुभ हस्ते भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे मराठावाडा अध्यक्ष म्हणून दिगांबर थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी रवींद्रनाथ मोरे यांची नियुक्ती करण्यात आली, संपादक विजय कदम यांची भ्रष्टाचार विरोधी मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली व पत्रकार दिलीप मुनेश्वर यांची यवतमाळ शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली नांदेड जिल्हा अध्यक्षपदी राज रतन नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली व राहुलजी गंगावणे साहेब यांच्या हस्ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले शेकडो कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये जो भ्रष्टाचार चालत आहे त्या भ्रष्टाचाराला कशाप्रकारे आळा येईल व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नियंत्रण कसे ठेवता येईल यावर मार्गदर्शन श्री गंगावणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!