गावंडे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी ब्युटी ॲंड स्किन केअर कार्यशाळा संपन्न उमरखेड,

youtube

गावंडे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी ब्युटी ॲंड स्किन केअर कार्यशाळा संपन्न

उमरखेड,

आजच्या आधुनिक युगात धकाधकीच्या जीवनात मुलींनी चेहरा आणि केसांच्या सुंदरतेची काळजी घेऊन योग्य पद्धतीने त्यांची निगा राखणे आवश्यक झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन नुकतीच येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी ब्युटी ॲंड स्किन केअर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नॅक समन्वयक प्रा. डॉ. कुंतल बोंपिलवार होत्या. महाविद्यालयात मुलींसाठी कार्य करणाऱ्या ‘नवी दिशा’ या संघटनेच्या अध्यक्ष प्रा. डॉ. शीतल सुर्वे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
उमरखेड येथील प्रसिद्ध मेकप आर्टिस्ट कल्याणी ठाकरे यांनी या कार्यशाळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रत्येक ऋतुनुसार आपली त्वचा, नखे आणि केसांची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी कोणता आहार घ्यावा, बाजारात उपलब्ध असलेली कोणती सौंदर्य प्रसाधने वापरावीत, हे सांगून बेसिक मेकप कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डॉ. वसुंधरा कदम शिंदे यांनी केले तर कार्यशाळेच्या समन्वयक, ग्रंथपाल प्रा. डॉ. सरला निंभोरकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

Google Ad
Google Ad

4 thoughts on “गावंडे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी ब्युटी ॲंड स्किन केअर कार्यशाळा संपन्न उमरखेड,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!