गोपाल गौरवाडयांची राष्ट्रीय आदिवासी महासंघाच्या विदर्भ प्रांत युवा निमंत्रक पदी निवड.
गोपाल गौरवाड यांची राष्ट्रीय आदिवासी महासंघाच्या विदर्भ प्रांत युवा निमंत्रक पदी निवड.
*प्रतिनिधी/ढाणकी*
ढाणकी येथील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक तथा युवा, डॅशिंग व निर्भीड पत्रकार गोपाल गौरवाड यांची राष्ट्रीय आदिवासी महासंघाच्या विदर्भ प्रांत युवा निमंत्रक पदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती राष्ट्रीय आदिवासी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक प्रवीण जेठेवाड यांनी केली. गोपाल गौरवाड यांचे सामाजिक कार्य व सामाजिक पकड लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली.देशातील अन्यायग्रस्त आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी महासंघाची स्थापना करण्यात आली असून, संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींना याद्वारे एकसंघ करण्याचे उद्दिष्ट या महासंघाचे आहेत.
या नियुक्तीच्या माध्यमातून राष्ट्रीय आदिवासी महासंघाचा प्रचार-प्रसार करणे. अन्यायग्रस्त आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी महासंघाचे सदस्य फॉर्म भरून घेणे. तथा विदर्भ प्रांतातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करून युवा टीम उभारून जिल्हा कोअर कमिटी तयार करणे. ही महत्त्वपूर्ण जबाबदारी गोपाल गौरवाड यांच्यावर सोपविण्यात आली. राष्ट्रीय आदिवासी महासंघाने दिलेली जबाबदारी मी समर्पणाने व समर्थपणे पार पाडेल असे मत गोपाल गौरवाड यांनी यावेळी व्यक्त केले. गोपाल गौरवाड यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.