उमरखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपा व शिंदे गटाचे वर्चस्व.
उमरखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपा व शिंदे गटाचे वर्चस्व !
प्रतिनिधी
उमरखेड :
तालुक्यातील तीन ग्रामपंचायत व चार ग्रामपंचायतच्या प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाने आपले वर्चस्व ठेवले आहे .
तालुक्यातील सुकळी ( ज ) चिल्ली (ज ) व अमानपूर या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यात आली होती . त्यापैकी अमानपुर ग्रामपंचायत ही अविरोध झाली होती . उर्वरित सुकळी व चिल्ली ग्रामपंचायतीसाठी काल झालेल्या मतदानाचा आज तहसील कार्यालय येथे निकाल लागला .त्यामध्ये सुकळी ( ज )सरपंचपदी प्रणाली मस्के ह्या तर चिल्ली ( ज सरपंचपदी बळीराम राठोड हे निवडून आले आहे .
चिल्ली ( ज ) ग्रामपंचायतच्या ९ सदस्यांसाठी झालेल्या निवडणूकीत सुरेश राठोड , माला आडे , शेख मुरादबाबा , युवराज जाधव, नभीबाई जाधव , सविता जाधव , कैलास राठोड , निता राठोड , करुणा पवार हे निवडून आले तर सुकळी (ज ) ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून माजी सरपंच शिवाजी रावते , विद्या बडेराव, अनुसयाबाई गंगात्रे , ज्ञानेश्वर कनवाळे, दिपाली कदम , संगीता शंकरराव वानखेडे , शेख असगर , शेख जहागीर , ज्योती राठोड निवडून आले आहे .
धनज , बिटरगाव (बु) बोरीवन व सिंदगी ग्रामपंचायतच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली यामध्ये धनज येथे विष्णूभगवान बोंबले , बिटरगाव (बु) अनुसया देवकते , बोरीवन येथे बजरंग मोहकर तर सिंदगी येथे गोदावरी जांभळे ह्या निवडून आल्या आहेत. .