अद्विता अर्बन मल्टीसिटी निधी लिमिटेडच्या उदघाटन सोहळा संपन्न.. माहुर
अद्विता अर्बन मल्टीसिटि निधी लिमिटेडचा उदघाटन सोहळा संपन्न.
श्रीक्ष्रेत्र माहूर…
माहूर तालूक्यातील डोंगर दर्यात वास्तव्यास असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसाईक, व सर्वसामान्य जनतेला व्यवसायासाठी, व पैशाचे व्यवहार सूरळीत करता यावे या उद्देशाने आठवडी बाजार परिसरात अद्विता अर्बन मल्टीसिटि निधी लिमिटेडतर्फे शाखा स्थापन करण्यात आली असून दिनांक 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून किनवट माहूर मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भीमराव केराम, व अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प. पू. शामबापू भारती महाराज यांच्या शूभहस्ते उदघाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड तर भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा, शिवसेना जिल्हा उपप्रमुख जोतीबादादा खराटे, रवि भले, सुनिल बेहरे, प्रदीप अण्णा पिंपरवार, गोविंद मगरे पाटील, अनिल वाघमारे, जेष्ठ कार्यकर्ते तथा पत्रकार विजय आमले, शिवसेना शहर प्रमूख निरधारी जाधव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला , यावेळी अद्विता अर्बन तर्फे दिल्या जाणाऱ्या सोई, सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शामबापू भारती महाराज यांनी केले , यावेळी भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा नगराध्यक्ष फिरोज दोसानी,शिवसेना जिल्हा उपप्रमुख जोतिबा खराटे, नगरसेवक राजेंद्र केशवे, यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.यावेळी शहरासह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरीक, व्यापारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विनी वाकोडे, यांनी केले तर नगरसेवक तथा संचालक गोपू महामूने यांनी उपस्थितांचे आभार मानले.