ढाणकी येथे आढळले पुरुष जातीचे अभ्रक.

youtube

ढाणकी येथे आढळले पुरुष जातींचे अभ्रक.

परिसरात खळबळ

ढाणकी प्रतिनिधी –
ढाणकी येथील टेंभेश्वर नगर परिसरात आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी अंदाजे सायंकाळी 5 च्या सुमारास दत्त मंदिराच्या मागे एक अंदाजे सात ते आठ महिन्याचे पुरुष जातींचे अभ्रक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहिती नुसार प्रथम हे अभ्रक गाई चारत असलेल्या व्यक्तीला दिसले व त्याने ही माहिती गावकर्यांना दिली. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेतली व अभ्रक शवविच्छेदन साठी पाठविले. यावेळी गावकऱ्यांची अभ्रक पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. वृत्त लिही पर्यंत कुठलाही गुन्हा नोंद झाला नसून पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कपिल मस्के, बिट जमादार मोहन चाटे, गजानन खरात, रवी गिते, निलेश भालेराव, सतिष चव्हाण करीत आहेत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!