बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष पदी मारोती गव्हाळे याची निवड.

बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष पदी मारोती गव्हाळे यांची निवड.
प्रतिनिधी= सविता चंद्रे उमरखेड
यवतमाळ जिल्हा अंतर्गत येत असलेल्या उमरखेड तालुक्यातील निंगनूर या पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या गावातील व येथील सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले श्री. मारोती गव्हाळे यांची बिरसा क्रांती दल यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
हे संघटन आदिवासी समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठी ,आत्मसन्मान, अस्तित्व, अस्मिता, संरक्षण आणि शिस्त ,शिक्षण, व संस्कृती संवर्धनासाठी वैचारिक व कँडरबेस पातळीवर काम करीत आहे.
एका अभ्यासू व्यक्तिमत्वाची, व उच्चशिक्षित,कणखर नेतृत्वाची, ग्रामीण भागातून जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याने त्यांच्या निवडीमुळे परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.
ते आपल्या निवडीचे श्रेय संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी, राज्य उपाध्यक्ष डि बि अंबुरे सर,यांना देतात. यावेळी डि. बि अंभोरे सर,नारायण पिलवंड सर, पेंदोर सर, कनाके सर, कोवे सर, व आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये यवतमाळ येथे निवड करण्यात आली.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Really superb information can be found on site.Money from blog