हवामान तज्ञ पंजाब डख २६ मे रोजी उमरखेडला येणार – शेतकरी बांधवांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
हवामान तज्ञ पंजाब डख २६ मे रोजी उमरखेडला येणार – शेतकरी बांधवांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा
उमरखेड –
या वर्षीचा उन्हाळा आपण बघतच आहोत गेल्या पंधरा दिवसापासून उन्हाळा असून सुद्धा जणू काही पेरणी योग्य वातावरण झाल्याचा भास दाखवून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आगामी पावसाळा कसा असेल ? पिकांची देखभाल कशी करावी? पेरणी कधी करावी ? याविषयी सखोल मार्गदर्शन करण्याकरिता प्रसिद्ध हवामान तज्ञ तथा हवामान अभ्यासक पंजाब डख आणि शेतकरी नेते तथा स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या संकल्पनेतून भव्य शेतकरी मेळावा दि. २६ मे २०२३ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता उमरखेड येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉल मध्ये आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याकरिता शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन मेळाव्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष,सचिव तथा सर्व सदस्य दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ उमरखेड तालुका यांनी केले आहे.
I¦ve recently started a web site, the info you provide on this site has helped me greatly. Thank you for all of your time & work.