मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाची लोहा तहसिलदारांना निवेदन.

मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाची
लोहा तहसिलदारांना निवेदन
लोहा –
पाचोरा येथील पत्रकारांस मारहाण करणाऱ्या आमदार समर्थकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोहा येथील मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लोहा तहसिलदारांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
सदरील निवेदनावर मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावळे, कार्याध्यक्ष विजयकुमार चनावार, उपाध्यक्ष विनोद महाबळे, सदस्य हनुमंत कंधारे, वैजनाथ मोरलवार यांच्या स्वाक्षऱ्याआहेत निवेदनाची प्रत लोहा पोलिस निरीक्षक यांना ही देण्यात आली