श्री कृष्ण अंबाळी देवस्थान विकासासाठी प्रयत्न करनार – खासदार हेमंत पाटील.
श्री कृष्ण अंबाळी देवस्थान विकासासाठी प्रयत्न करनार – खासदार हेमंत पाटील
उमरखेड : श्री कृष्ण अंबाळी देवस्थान ला परराज्यातुन त्यातच भक्त देशातून या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात मात्र या देवस्थानचा राज्याच्या देवस्थान तुलनेत भाविका साठी सुविधात्मक विकास झाला नाही , विश्वस्त मंडळांनी पुढाकार घेऊन धार्मिक पर्यटन विकास करण्याचा आराखडा द्यावा त्या बाबत राज्याचे मुख्यमंत्री यांचे कडे पाठपुरावा करून या परिसरात ला न उपयोगी असलेला भाग उपयोगात आनून संस्थान च्या २९ एकर जमीनी डोंगराळ परिसरात धार्मिक पर्यटन निधीतून श्री कृष्ण अंबाळी देवस्थान प्रयत्न करनार असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटिल यांनी नवरात्र महोत्सवात देवस्थान ला २१ ऑक्टोंबर रोजी भेट दिल्या नंतर उपस्थित भक्त गण कार्यक्रमा प्रसंगी केले
राज्यात शनिसिंगनापुर , माहुर , शेगांव आणि शिर्डी देवस्थान चा धार्मिक पर्यटन विकास निधीतून विकास झाला त्याच धर्तीवर विश्वस्त मंडळ यांच्या प्रमुख समन्वं यातुन श्री कृष्ण अंबाळी देवस्थानच्या २९ एकर उपलब्ध जमीन असलेल्या जागेत या तिर्थ क्षेत्राचा सर्वांगिन विकास होईल
या विकासाला गती प्राप्ती साठी लगेचच मास्टर प्लान तयार मध्ये महिला – पुरुष सार्वजनिक शौचालय , तलाव , प्रशस्त भक्त निवास , ३३ के व्ही विज केन्द्र , सिमेंन्ट रस्ते , वळण रस्ते संरक्षन भींत करण्याच्या आराखडा सुचना उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंते प्रमोद दुधे यांना या विकासाठी सुचना केल्यात हा विकास झाला तर भक्ताना सर्व बाबतीत उपयोगी अशी व्यवस्था होऊन शेतकरी बचत गटाला पण कामे मिळतील असे अधिक बोलतांना खासदार हेमंत पाटिल म्हणाले
या वेळी माजी आमदार प्रकाश पाटिल देवसकर , गोदावरी अर्बन च्या अध्यक्षा राजश्री पाटिल , संस्थानचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष प्रकाश साले , नांदेड चे माजी महापोर किशोर भवरे , वसंत कारखाना अध्यक्ष अजय देशमुख , संस्थान उपाध्यक्ष भिमराव पाटिल चंद्रवंशी , सचिव वासुदेव झरकर , तातु देशमुख , दतराव शिंदे , नंदकिशोर खामनेकर , अंबाळी सरपंच दादाराव धुमाळे ,अतुल मैड , कपिल चव्हाण , अविनाश कदम , तानाजी चंद्रवंशी , संतोष जाधव , मोहिनी नाईक , सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता प्रमोद दुधे , अभियंता योगेश ढोले , वसंत खसावत , सखाराम पाटिल यादवकुळे ,या विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी , उपदेशी सादु या सह सर्व भक्त गण उपस्थित होते