उमरखेड -महागाव विधानसभेतील पोलीस ठाण्यांचा होणार कायापालट  उमरखेडला ग्रामीण पोलिस ठाणे तर बिटरगाव ठाणे ढाणकीला येणार  आमदार ससानेंच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय.

youtube

उमरखेड -महागाव विधानसभेतील पोलीस ठाण्यांचा होणार कायापालट
उमरखेडला ग्रामीण पोलिस ठाणे तर बिटरगाव ठाणे ढाणकीला येणार

आमदार ससानेंच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी

उमरखेड

उमरखेड -महागाव विधानसभेतील पाच पोलीस ठाण्यापैकी उमरखेड व दराटी पोलीस ठाणे हे सुसज्ज इमारतीत असून पोलीस कर्मचाऱ्यांची निवासाची देखील व्यवस्था आहे . मात्र पोफाळी , महागाव व बिटरगाव पोलीस ठाण्याच्या कार्यालयाची इमारती अभावी कार्यालयीन कामकाज करताना व निवासी राहत असताना पोलिस कर्मचार्‍याना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे .या तीनही पोलीस ठाण्याच्या बाबतीत उमरखेड – महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे यांच्या सूचनेवरून काल दिनांक 19 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे बैठक पार पडली.

या बैठकीत बिटरगाव पोलीस स्टेशन हे ढाणकी येथे स्थलांतरित करणे , पो.स्टे . इमारत व कर्मचारी निवास स्थानासाठी ढाणकी येथे जागा उपलब्ध करून देणे ,पोफाळी पोस्टेला इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठी प्रशासकीय बांधकामाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करणे ,महागाव पोस्टे प्रशासकीय इमारती करिता जिल्हा परिषदेची जागा हस्तांतरित करणे व प्रशासकीय इमारतीचा प्रकल्प अहवाल तयार करणे , उमरखेड पोस्टेचे विभाजन करून ग्रामीण पोलिस ठाण्याची निर्मिती करणे हे चार विषय कालच्या बैठकीत करण्यात आले.
ढाणकी पोस्टेसाठी नगरपंचायतने इ क्लास ची जागा देणे संदर्भात ठराव घेतला असून त्याबाबत पुढील कार्यवाही करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावा त्यानंतर जागा हस्तांतरित होणार आहे . पोफाळी पो स्टे जागेची तात्काळ मोजणी करून पोस्टे इमारत आणि निवासस्थाना चा प्रकल्प अहवाल बनवून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पाठवावा ,महागाव पोस्टे इमारत संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जीपचा ठराव घेऊन जि .प .च्या मालकीची जागा पोलीस विभागास हस्तांतरित करण्याचा ठराव ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठवावा .उमरखेड पोस्टेचे विभाजनाबाबत स्पष्ट अहवाल ठाणेदाराने उमरखेड उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून पुढील कारवाई करावी असे विषय जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत पार पडले .
या चारही विषयाबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
उमरखेड – महागाव विधानसभेतील पोलिस ठाणे कार्यालयाबाबत आमदार ससाने यांनी वेळोवेळी पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडे पाठपुरावा केल्याने लवकरच पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाची व्यवस्था होणार आहे . जिल्हाधिकारी यांच्या बैठकीला आमदार नामदेव ससाने,भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा , अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक पियुष जगताप, निवासी जील्हाअधिकारी प्रकाश राऊत , जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी मयांक घोष , उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी , बिटरगाव ठाणेदार सुजाता बनसोड तसेच पोफाळी व महागावचे ठाणेदार उपस्थित होते .
सोबत फोटो :
जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठकीत मान्यवर

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!