नागपूर -तुळजापूर ढाणकी रोड वरील उड्डाण पुलाजवळ दोन वाहनांची समोरा समोर धडक ९जखमी तर २ जन अत्यवस्थ ! (देवदर्शन करून परतताना घडला अपघात)

youtube

नागपूर -तुळजापूर ढाणकी रोड वरील उड्डाण पुलाजवळ दोन वाहनांची समोरा समोर धडक ९जखमी तर २ जन अत्यवस्थ !
(देवदर्शन करून परतताना घडला अपघात)

उमरखेड : (शहर प्रतिनिधी) देवदर्शन करून गावाकडे परतणाऱ्या वाहनाचा व समोर येणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याने ९जण गंभीर तर २ जन अत्यवस्थ झाल्याची घटना शहरानजीक ढाणकी रोड वरून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ उड्डाण पुलाजवळ दिनांक २९ एप्रिल रोजी रात्री अंदाजे साडे सात वाजेच्या दरम्यान घडली . तेलंगणा राज्यातील कुटुंब माहुर व पोहरा देवीचे दर्शन आटोपून टाटा वाहनाने आपल्या गावाकडे जात असतांना शहरालगत असलेल्या बायपास समोरून येणाऱ्या एम . एच . ०४ एफ एफ . ७७१० या वाहनाने धडक दिली . दोन्ही वाहनातील ११ जण जखमी झाले . टाटा वाहनातील चांगुनाबाई शेगर ,चांगुनाबाई ४० , तुकाराम शेगर ६० , आशाबाई शेगर ३० , रंजना शिंदे ३० , सिताराम शेगर ३५ , साईनाथ शिंदे ०४ , राजेश शेगर ०८ , करण शेगर १४, पुजा शेगर १२ सर्व राहणार हदगांव ता. मुधळ जि. निर्मल तेलगंगा अशी जखमींचे नावे आहेत तर महिंद्रा वाहनातील चालक कृष्णा रूडे ३५ व विनोद चव्हाण ४० रा. उमरखेड रुडेनगर तांडा उमरखेड हे जखमी झालेत .
देवदर्शन आटोपून परत निघालेल्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली या घटनेत तब्बल ११ जण जखमी झाले असून यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविले असल्याची माहिती पुढे येत असून उर्वरित ९ जनावर उमरखेड शहरातील साई रुग्णालय येथे उपचार सुरू असल्याचे कळत आहे याबाबतीत अधिक माहिती अशी की तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यात येत असलेल्या मुधळ तालुक्यातील हदगाव येथील महिला पुरुष व मुले अशी१५ ते २० जन पोहरादेवी येथे दोन वाहने घेऊन देवदर्शनासाठी गेले होते पोहरादेवी येथून हे सर्व भाविक आपले वाहन घेऊन माहूर येथे देवदर्शनसाठी गेले होते माहूर येथील देवदर्शन आटोपून हे सर्वजण राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरून वेगवेगळ्या दोन वाहनातून परत येत होते अशातच उमरखेड शहरानजीक असलेल्या ढाणकी रोडवरील उड्डाण पुलाजवळ यातील एका वाहनाला समोरून येणाऱ्या महिंद्रा कंपनीचे वाहन क्रमांक एम एच ०४ ७७१० या वाहनाच्या वाहन चालकाने समोरासमोर धडक दिली व नऊ जणांना जखमी करून वाहनाचे एक लाख रुपयाचे नुकसान केले असल्याबाबतची तक्रार काशिनाथ चिमाजी शेगर राहणार हदगाव यांनी उमरखेड पोलिसात दिली असून पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत.

Google Ad
Google Ad

1 thought on “नागपूर -तुळजापूर ढाणकी रोड वरील उड्डाण पुलाजवळ दोन वाहनांची समोरा समोर धडक ९जखमी तर २ जन अत्यवस्थ ! (देवदर्शन करून परतताना घडला अपघात)

  1. I do believe all the ideas youve presented for your post They are really convincing and will certainly work Nonetheless the posts are too short for novices May just you please lengthen them a little from subsequent time Thanks for the post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!