संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरखेड तर्फे जाहीर निषेध.

youtube

संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरखेड तर्फे जाहीर निषेध

उमरखेड …..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडुन निवेदन पोलिस स्टेशन ,तहसिलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. महिला नेत्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे या अतिशय विनम्र व अभ्यासू महिला नेता असून देशाच्या सर्वोच्च सभागृहात त्यांना पाच वेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त झालेला असून देशात स्वतःचे उंचस्थान प्राप्त केले आहे.
अश्या प्रभावशाली महिला नेत्यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी अश्लील शिवीगाळ केली त्यामुळे खासदार सुप्रियाताई सुळे यांची अब्रू नुकसान झाले असून ही बाब एका महिलेकरिता अपमानास्पद असून अब्दुल सत्तार यांनी जाणून-बुजून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मन हेलावून टाकणारी आहे.
संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या या मुजोरमंत्र्यावर कठोर कार्यवाही करून मंत्रिपदावरून हकालपट्टी झालीच पाहिजे.
आज संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवेदन देतांना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते
राजू जयस्वाल, बालाजी वानखेडे,शंकर तालंगकर, बळी तात्या चव्हाण, अविनाश जाधव, शंकर जाधव, प्रकाश जाधव , शिवलाल राठोड , भिकू पाटील, सूर्यकांत पंडित, वि. ना. कदम सर, युसुफ सौदागर, रहेमत जहागीरदार ,बबलू जाधव, मिथीलेश जयस्वाल, झाकीर राज, अमोल सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, अविनाश यादवकुळे, अविनाश आसोले, पवन धुमाळे,नदीम पठाण, तहेझिर भाई, यासीन भाई, शेख रहेमान, रोहित हेलगंड राहुल बानसकर उपस्थित होते

Google Ad
Google Ad

1 thought on “संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरखेड तर्फे जाहीर निषेध.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!