उमरखेड जिनिंग प्रेसिंगच्या निवडणूकीत राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबतच राहणार

youtube

उमरखेड जिनिंग प्रेसिंगच्या निवडणूकीत राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबतच राहणार
राष्ट्रवादीच्या तालूका अध्यक्षाचा निषेध  पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी नेत्यांचा खुलासा

पुण्यनगरी / शहर प्रतिनिधी
उमरखेड : १८ जुन रोजी होवु घातलेत्या जिनिंग प्रेसींगच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तालूका अध्यक्ष शंकर तालंगकर यांनी भाजपा – शिन्दे गटासोबत युती केल्याच्या बातम्या प्रकाशीत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असून राष्ट्रवादी तालूका अध्यक्षाचा धिक्कार करीत निषेध करून उमरखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वच निवडणूकामध्ये महाविकास आघाडी सोबतच राहणार असल्याचे आज पत्रकार परिषदेत स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगीतले .
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालूका अध्यक्ष यांनी भाजपा शिन्दे गटासोबत युती केल्याचा संभ्रम तालुक्यात निर्माण केल्याने कार्यकर्त्यामध्ये चलबिचल झाली आहे .
अगोदर पक्षविरहित पॅनल म्हणून सत्यशोधक पॅनलची घोषणा करणाऱ्यांनी रा .कॉ . तालूका अध्यक्षा सोबत भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या निवासस्थानी जावून युती झाल्याचे जाहीर केले . रा. कॉ . अध्यक्षाला पक्ष भाजपाच्या दावणीला बांधण्याचा अधिकार नसून त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा व खुशाल भाजपात जावे . त्यांच्या या कृत्याची पक्षश्रेष्ठीनी दखल घेवून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करीत राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडी सोबतच पुढील सर्व निवडणूका लढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले . पत्र परिषदेला यावेळी माजी नगर अध्यक्ष राजुभैय्या जयस्वाल, विधानसभा अध्यक्ष रा .कॉ . भिमराव पाटील चंद्रवंशी, दत्तात्रय गंगासागर , प्रकाश जाधव, स्वप्नील कनवाळे, बळवंत चव्हाण, सुर्यकांत पंडीत, बालाजी डाखोरे , संभाजी कदम उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

2 thoughts on “उमरखेड जिनिंग प्रेसिंगच्या निवडणूकीत राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबतच राहणार

  1. I am really loving the theme/design of your site.
    Do you ever run into any web browser compatibility issues?
    A few of my blog readers have complained about
    my site not working correctly in Explorer but looks great in Opera.
    Do you have any recommendations to help fix this
    problem?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!