मोतीराम राठोड यांच्या मालकीच्या जागेवर शेजाऱ्याचे अतिक्रमण – न्यायाच्या प्रतिक्षेत.
मोतीराम राठोड यांच्या मालकीच्या जागेवर शेजाऱ्याचे अतिक्रमण…
ग्रामपंचायतची बघ्याची भूमिका.
ढाणकी प्रतिनीधी-
तालुक्यातील भवाणी ग्राम चे ग्रामस्थ मोतीराम राठोड यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर दडपशाही करून गावातीलच व्यक्तीने अतिक्रमण करून राहत्या घराच्या समोरील खुल्या जागा बळकावुन तेथे पत्रे शेड उभे करून गरिब राठोड कुटूंबावर अन्याय केला आहे.
न्याय मागण्यासाठी ग्रामपंचायतचे उंबरठे झिजवताना पादत्राणे तुटली मात्र न्याय मिळाला नाही. अन्याया विरूध्द व झंुड शाहीला रोखन्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली मात्र 15 दिवसाचा कालावधी लोटुनही घटना स्थळाचा पंचनामा करण्यास दराटी पोलीसांना वेळ मिळाला नसल्याची खंत मोतीराम राठोड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदे मध्ये व्यक्त केली.
घरासमोर मोकळया जागेवर मोतीराम सोमला राठोड ची परिस्थीती नाजुक असल्याने घराचा फक्त त्यांनी पाया बांधुन जागा खुली सोडली होती. त्या जागेवर तत्कालीन ग्रामपंचायच्या पदाधिकारी व अधिका-यांनी सदर जागेचा फेरफार मोतीराम यांच्या माघारीच करून अनुक्रमांक 5़95 मिळकत क्रमांक 595 या मालमत्ते संदर्भात सविता अनिल राठोड यांच्या नावे करून दिला. त्या फेरफाराची बोगसपणा करून नोंद केल्याचा आरोप सुध्दा मोतीराम यांनी केलेला आहे. त्यांनी ग्रामपंचायत कडे फेरफाराचे पुरावे मांगीतले तेव्हा ग्रामपंचायत सचिवाने रेकाॅर्ड उपलब्द नसल्याचे लेखी दिल्याने सदर प्रकरणात संक्षयाचे वातावरण दिसत असुन ग्रामपंचायत च फक्त बघ्याची भुमिका घेत आहे.
गवातील झुंडशाही प्रवृत्ताीच्या नागरीकांनी भवाणी ताडयात वास्तव्यास असलेल्या मोतीराम सोमला राठोड यांच्या राहत्या घराच्या समोरील मोकळया जागेत दिनांक 19/04/2022 रोजी गावातील सात ते आठ नागरीक अतिक्रमण करण्यासाठी दहषत पसरवित हातात सब्बळ, कुदळ, व लोखंडी शेड चे साहित्य घेवुन त्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्देषान पोहचले. मोतीराम राठोड व त्यांच्या कुटूंबियांनी मनाई करताच त्यांनी त्यांना धक्काबुक्की करत त्या ठिकाणी असलेल्या मोतीराम राठोड यांच्या साहित्याची फेकाफेक सुरू केली. तेथे पत्राचे शेड उभे केले. अन्यायग्रस्त कुटूंबाला मारहाण केली. या झटापटीत मोतीराम राठोड यांना मुका मारही लागला. सदर व्यक्तींचा मुकाबला न करता त्यांच्या विरूध्द पोलीस कारवाई करण्यासाठी त्यांनी दराटी पोलीस स्टेषन ला धाव घेतली. व सदर व्यक्तींवर तक्रार नोंदवीली.
पोलीसांनी गैरअर्जदार बाळु तुळषिराम मुडे, जमुनाबाई बाळु मुडे, अमोल बाळु मुडे सर्व राहणार भवाणी तांडा यांच्रूा विरूध्द गुन्हे दाखल केले.
(प्रतिक्रीया)
सदर जागेबाबतचा वाद हा महसुल व ग्रामपंचायत षी संबधित आहे. त्या जागेवरून त्या दोघात पुन्हा पुन्हा वाद होउ नये अथव चिघळु नये म्हणुन पोलीस प्रषासनाकडुन दोन्ही पक्षावर गुन्हे नोंद करून प्रतिबंधक कारवाई केली आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागेल.
(भरत चपाईतकर, ठाणेदार दराटी पो.स्टे)