अबब एका हेक्टर जमिनीत रोपवाटिका व फळबागेतुन केले उपन्न सदाशिव घिरटकर.

youtube

पळसा येथील घिरटकर यांनी एका हेक्टर जमीनीत रोपवाटिका व फळबागेतुन केले चांगले उत्पन्न
पळसा..सविता चंद्रे
शेतकरी शेती मध्ये अहोरात्र मेहनत घेऊन काम करत असताना वेळोवेळी बदलत्या वातावरणाचा फटका बसत असल्याने अडचणीत सापडला आहे.पण पळसा येथील अल्पभुधारक शेतकरी सदाशिव घिरटकर यांनी रोपवाटिका व फळबाग लागवड करुन अंतर पिक उत्पादन करीत चांगले उत्पादन मिळवले आहे.
पळसा ता.हदगांव सदाशिव घिरटकर ( बाळु महाराज) यांची मानवाडी येथील तिर्थक्षेत्र हनुमान मंदीरालगत अंबाळा शेतशिवारात गट क्रं ५८ मध्ये पळसा ते मानवाडी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत दोन्ही बाजूने मिळुन पाच एकर जमीन होती.रोडलगतची खरबाड जमीन पिकत नसल्याने काही वर्षांपूर्वी तिनं एकर जमीन विक्री केली. राष्ट्रीय महामार्गात जमीनीचे एवढे पैसे मिळतात असे कधीच वाटले नसल्याने जमीन विक्री केली. आज करोडपती होण्याचे योग आला होता पण खचुन न जाता नशीबात जे आहे ते घ्यावे लागते.या म्हणीप्रमाणे हार न मानता दोन एकर जमीन क्षेत्रात दोन मुलांच्या मदतीने शेतात विहीर करून एका मुलांना बारामती येथे प्रशीक्षण घेऊन नव्या उमेदीने शेती सुरू केली.
दोन एकर जमीन क्षेत्रात चांगल्या दर्जाची झेंडु ची लागवड करुन या वर्षी झेंडु ला चांगली मागणी चांगल्याप्रकारे कमाई झाली.तर दोन एकर जमीनी पैकी विस गुंठे क्षेत्रात सोयाबीन व नंतर चांगल्या दर्जाचा गहू पेरणी केली.तर बाकी साठ गुंठे जमीन क्षेत्रात पपई लागवड करुन अंतर पिक म्हणून गोभी व वांगे लागवड केली.दहा गुंठे जमीनीत भाजीपाला लागवड केली.तर बाकी च्या जमीनीत शेड उभारून दोन मुले व स्वतः कुटुंबाला सोबत घेऊन जय हनुमान रोपवाटिका सुरू केली असल्याने परीसरातील शेतकऱ्यांना मिरची, वांगे,फुलगोभी, पत्ता गोभी,तमाटा, शेवगा, ढोबळी मिरची, टरबुज,खरबुज, या जातीचे रोप खरेदी साठी अर्धापूर पार्डी येथे जावे लागत होते ते आता मानवाडी येथे सर्वच रोपे जय हनुमान रोपवाटिका मध्ये आडरप्रमाणे तयार करून मिळत असल्याने शेतकरी येवून घेऊन जात आहेत.रोपवाटीका व फळबागेतुन दोन एकर जमीन क्षेत्रात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळाले आहे. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असल्याने महात्मा फुले योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे. शेतकरी सदाशिव घिरटकर (बाळु महाराज) यांनी सांगितले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!