महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड येथील शासकीय रूग्णालयात महारक्तदान शिबिर संपन्न.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड येथील शासकीय रूग्णालयात महारक्तदान शिबीर संपन्न
उमरखेड –
महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य शिबिराचे तसेच महा रक्तदान शिबिराचे उद्घाटन विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन पुतळा यांच्या हस्ते करण्यात आले .
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांनी निर्देशित केल्यानुसार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी राज्यभर आरोग्य शिबिरांचे तसेच महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात करण्याकरिता सूचना प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य शिबिर व महार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
रक्तदान शिबिराचे उद्घाटक म्हणून आमदार नामदेव ससाणे व भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन पुतळा उपस्थित होते .
आमदार नामदेव ससाणे यांनी बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सर्व रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन पुतळा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व रक्तदात्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.रमेश मंडन डॉक्टर जब्बार पठाण डॉ. किशोर कपाळे डॉ. किशोर राठोड डॉक्टर गजानन डोंगे डाँ. प्रति मुक्कावार डॉ शिवानंद देवसरकर डॉ आशिष उगले डॉ. गारुळे रुग्णवाहिका चालक योगेश ठाकूर श्रीमती चलावार, शितल बोडके, वैशाली धोंगडे, दिलीप कांबळे, सुरेश मुनेश्वर शिवाशीष भाग्यवंत सह सर्व कर्मचारी उपस्थित होते
मुख्य चौकट
महा आरोग्य तपासणी शिबिर 402 रुग्णांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली .
व महा रक्तदान शिबिरात लिहीपर्यंत 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते
यात उपजिल्हा रुग्णालय येथील सर्वात जास्त कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले त्यात दोन महिलांनी रक्तदान केले .
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.