कामगाराचा उपोषणाचा तिसरा दिवस -सहा आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडली दोन रुग्णालयात दाखल.

youtube

 

कामगाराचा उपोषणाचा तिसरा दिवस -सहा आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडली दोन रुग्णालयात दाखल

पोफाळी : येथील वसंत सहकारी कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोर वसंत कामगार संघटनेच्या कामगारांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसलेल्या कामगारांपैकी सहा आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली असून यातील दोन आंदोलन कर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यामुळे कामगारात रोष वाढला आहे, आंदोलनाचा तिसरा दिवस पूर्ण होऊनही अवसायक यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

दोन फेब्रुवारी कामावर घेण्यासंदर्भात वसंत कामगार युनियनच्या कामगारांनी कामावर घेण्यासंदर्भात अवसायक यांना निवेदन सादर केले होते पाच फेब्रुवारीला अवसायक,भैरवनाथ शुगर वर्क्स व कामगारांमध्ये चर्चा झाली त्यानंतर दुसरी निर्णायक बैठक आठ फेब्रुवारी घेण्यात येणार होती मात्र अवसायक यांच्या बदली नाट्यामुळे आठ फेब्रुवारीची बैठक होऊ शकली नाही दरम्यान 9 फेब्रुवारीपासून 16 कामगारांनी असायक यांच्या प्रशासकीय कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता उपोषणाला सुरुवात केली उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दहा मार्चला सायंकाळी अवसायक योगेश गोतरकर, भैरवनाथ शुगर वर्क्स व कामगारांमध्ये एक चर्चा झाली त्यात कामगारांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी उपोषण कायम ठेवले.

शनिवारी उपोषणाचा तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांवर बेमुदत आमरण उपोषणाचा परिणाम दिसून आला 16 आंदोलनकर्त्यांपैकी सहा आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली आहे मळमळ उलट्या व पोट दुखी यासारखा त्रास आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून आला आहे. यातील ज्ञानेश्वर सूर्यवंशी व चद्रशेखर धुमाळे या दोन आंदोलकर्त्याना मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर सूर्यवंशी, चद्रशेखर धुमाळे,आत्माराम दोडके ,प्रमोद कांबळे, कैलास मांगुळकर व भानुदास चव्हाण यांना पोटदुखी,डोकेदुखी,मळमळ व उलटी झाल्या.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “कामगाराचा उपोषणाचा तिसरा दिवस -सहा आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडली दोन रुग्णालयात दाखल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!