उमरखेड येथे अखंड शिवनाम सप्ताहास प्रारंभ.

youtube

उमरखेड येथे अखंड शिवनाम सप्ताहास प्रारंभ
उमरखेड:-

येथील शिवाजी वार्डातील महात्मा बसवेश्वर संस्थान शिव मंदिरात आजपासून अखंड शिवनाम सप्ताह सुरुवात झाली सकाळी पंचाक्षरी खडकेश्वर महाराज व सोनु खडकेश्वर महाराज यांचे पौरोहित्यात महात्मा बसवेश्वर महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते महादेवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर प्रफूल माधवअप्पा दुधेवार अश्विनी  दुधेवार या दाम्पत्याच्या हस्ते पंचकलश पूजन करण्यात आले. ग्रंथराज “परमरहस्य” पारायण प्रमुख. रजनीताई वगररकर यांचे उपस्थितीत परमरहस्य पारायण सुरुवात झाली. पारायणास शेकडो महिलांची उपस्थिती आहे.
सप्ताहात दररोज सकाळी शिवपाठ शिवनाम जप ,अभिषेक व आरती,परमरहस्य पारायण, गाथा भजन,प्रवचन, शिवपाठ व शिवनाम जप ,श्री सागर महाराज वाशिम यांच्या सुश्राव्य वाणीतुन शिवकथा, राञी शिवजागर असे कार्यक्रम होणार आहेत. या अखंड शिवनाम सप्ताहात संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज व राष्र्टसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मूर्तीचे अनावरण, अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .अनेक दानशूर भक्त व कार्यकर्ते पारायणास बसलेल्या भक्तांसाठी अन्नदान व्यवस्था करणार असून अखंड शिवनाम सप्ताह उत्सव समितीतर्फे रविवार दिनांक १९ फेब्रूवारी २०२३ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या शिवनाम सप्ताहाच्या ज्ञान यज्ञात सहभागी व्हावे व शिवकथाही श्रवण करावी असे आवाहन महात्मा बसवेश्वर संस्थान व अखंड शिवनाम सप्ताह उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “उमरखेड येथे अखंड शिवनाम सप्ताहास प्रारंभ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!