पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या कामांच्या जाहिराती रोटेशननुसार द्या दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे निवेदन

youtube

पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या कामांच्या जाहिराती रोटेशननुसार द्या

दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे निवेदन

उमरखेड :- पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरील विविध कामकाजासंदर्भात वृत्तपत्रात शासनाच्या रोटेशननुसार जाहिराती दिल्या जातात. जाहिरातीबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, लेखासहिता १९६८ नियम क्रमांक १३८ (१) ते (६) मध्ये तरतूद करण्यातआलेली आहे. मात्र आज पर्यंत पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या मार्फत कोणत्याही वृत्तपत्रांना जाहिराती देण्यात आलेल्या नाहीत. यापुढे सदर शासन परिपत्रकानुसार विविध वृत्तपत्रांना जाहिराती देण्यात याव्या अशा आशयाचे निवेदन आज दिनांक 10 डिसेंबर रोजी उप माहिती अधिकारी ( प्रभारी ) यांना दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात आले.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन परिपत्रक क्रमांक झेडपीए 2006/ प्र. क्र. 366/ वित्त – 9, मंत्रालय, मुंबई दिनांक 31 डिसेंबर 2009 महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, लेखासहिता १९६८ नियम क्रमांक १३८ (१) ते (६) मध्ये ग्रामस्तरावर तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर विविध होणाऱ्या कंत्राट व कामकाजाबाबत वृत्तपत्रातून जाहिरात प्रकाशित करणे अनिवार्य असते पण आजपर्यंत या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती यापुढे सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करून पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय मार्फत विविध कामकाजा संदर्भात वृत्तपत्रातून जाहिराती रोटेशन पद्धतीने प्रकाशित करण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत नंदनवार सचिव अरविंद ओझलवार यांच्या वतीने माहिती संचलनालयाचे उप माहिती अधिकारी , गटविकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी संघटनेचे अध्यक्ष बालाजी वानखेडे यांना देण्यात आले. यावेळी प्रशांत भागवत, वसंतराव देशमुख, अजहर उल्ला खान ,अरुण बेले, वेंकटेश पेन्शनवार , निळकंठ धोबे , अविनाश मुन्नरवार , शैलेश ताजवे, डॉ शिवचरण हिंगमिरे, संतोष कलाने, साहेबराव धात्रक, अजय कानडे , विशाल माने, अंकुश पानपट्टे, सलमान अशहर खान, ताहेर मिर्झा, संजय देशमुख, रवी भोयर उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

8 thoughts on “पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या कामांच्या जाहिराती रोटेशननुसार द्या दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!