प्रा. स्वप्निल सोनवणे साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित बदलापूर
प्रा. स्वप्नील सोनवणे साहित्य गौरव पुस्काराने सन्मानित
बदलापुर….
नागरिकांना संविधानाची किमान तोंडओळख व्हावी आणि त्यांच्या वर्तनात उचित व विधायक बदल व्हावा यासाठी “भारतीय संविधानाची उद्देशिका” या ग्रंथाचे लेखन केले आहे. सदर ग्रंथाचे प्रकाशन ना. मा. उपमख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सामजिक न्याय मंत्री ना. मा. धनंजय मुंडे यांचा उपस्थित मंत्रालयात केले आहे.
संविधानिक मूल्यांचा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रचार व प्रसार व्हावा त्याकरीता ग्रंथांची मांडणी सुलभ भाषेत केली आहे.
“साहित्य संगम प्रतिष्ठान” ठाणे यांच्या वतीने महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च नावलौकिक असणारा साहित्य गौरव पुरस्कार” २०२१ ने प्रा. स्वप्नील सोनवणे यांना सन्मानीत केले आहे. सदर गौरव पुरस्कार वितरण मराठी ग्रंथ संग्रालय ठाणे येथे संपन्न झाला आहे.
प्रा. स्वप्नील सोनवणे यांनी हा सन्मान तमाम संविधान प्रेमींना समर्पित केला आहे.
सदर ग्रंथाचे संपादन श्री. विठ्ठल मोरे, बदलापूर यांनी केले आहे तर प्रा. संतोष राणे (शारदा प्रकाशन ठाणे) यांनी प्रकाशन केले आहे.
याप्रसंगी लेखकांनी महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यातून वाचकांच्या खास आग्रहास्तव अवघ्या पाचच महिन्यात संपादक व प्रकाशकांनी ग्रंथांची तिसरी आवृत्ती संविधान प्रेमींना उपलब्ध करून दिल्याबद्दल संपादक व प्रकाशकाचे आभार मानले आहेत.