शालेय पोषण आहारामध्ये झालेल्या गैर प्रकारात मुख्याध्यापक निंबित
शालेय पोषण आहारामध्ये झालेल्या गैर प्रकारात मुख्याध्यापक निंबित….
उमरखेड/प्रतिनिधि –
न.प. उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा उमरखेड येथील मुख्याध्यापक पदावर कार्यरतअसलेले समीर अहेमद शेख मुर्तुजा यांना शालेय पोषण आहारामध्ये झालेल्या गैर प्रकरणामध्ये गट शिक्षणाधिकारी तथा चौकशी समिती अध्यक्ष, पंचायत समिती उमरखेड यांनी, कर्तव्यात कसुर करून शालेय व्यवहाराकडे दुर्लक्ष, करीत शालेय पोषण आहाराची जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्यामुळे दोषी ठरवून पदावरून निलंबित करण्यात आल्याचा अहवाल दिला असून समीर अहेमद शेख मुर्तुजा यांनी आपल्याकडील मुख्याध्यापक पदाचा प्रभार सायकासिमी शेख वसिम अहेमद यांचेकडे दयावा असेही त्यांनी या अहवालात नमूद केले असून निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्यालय नगरपरिषद उर्दू माध्यमिक कन्या शाळा उमरखेड राहील, समीर अहेमद शेख मुर्तुजा यांनी दररोज सदर शाळेमध्ये उपस्थित राहुन सहा. शिक्षकाचे काम पाहावे असे गट शिक्षण अधिकारी तथा चौकशी समिती अध्यक्ष, प. स.उमरखेड यांनी आपल्या चौकशी अहवालात उल्लेखित केले आहे