शिवजयंती महोत्सव समिती तर्फे आयोजित आरोग्य शिबीर ला भरघोस प्रतिसाद

शिवजयंती महोत्सव समिती तर्फे आयोजित आरोग्य शिबीर ला भरघोस प्रतिसाद
उमरखेड :-
स्थानिक राजस्थानी भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजयंती महोत्सव समिती व भगवती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड तर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, व मोफत औषधी वाटप ला गरजु रुग्णांनी भरघोस प्रतिसाद.
या मोफत आरोग्य तपासणी शिबीर मध्ये १२० रुग्ण ई सि जी, १५० शुगर तपासणी, ३५ पोटविकार रुग्ण, २० अर्थोपीडिक, ३० हृदय विकार संबंधित रुग्णांनी तसेच ३० रक्त दात्यानी रक्तदान केले जिजाऊ ब्लड सेंटर च्या रक्तपेढी चे कर्मचारी,डॉ अंकुश देवसरकर, डॉ गोविंद शिंदे, डॉ प्रकाश चिद्रावार, डॉ सुशांत डावरे, डॉ राजेंद्र कांगणे, डॉ निलेश भांगे, डॉ प्रीती कदम, डॉ कावेरी कपाटे यांनी रुग्ण तपासले व औषदोपचार केले. या आरोग्य शिबारासाठी डॉ संजय तेला कोषाध्यक्ष व शिवजयंती महोत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.