चुरमुरा येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू नातेवाईकांचा खुन झाल्याचा आरोप उमरखेड:
चुरमुरा येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू
नातेवाईकांचा खुन झाल्याचा आरोप
उमरखेड:
चुरमुरा येथील नंदकुमार नारायण काळे वय वर्ष ४२ ऊसतोड मजूर म्हणून मजुरीचे काम करीत होता. नंदकुमार नारायण काळे सदर युवकाने एका व्यक्तीकडून उसनवारी पैसे घेतले होते. ते घेतलेले परत करण्याचा दाखला नारायण याच्यामागे सदर व्यक्तीने लावल्याने पैशाच्या मोबदल्यात घराची जागा देण्याची सुद्धा कबूल झाला होता. तरी पैसे देणाऱ्या व्यक्तीकडून नारायण यास धमकी देणारे फोन सातत्याने सुरू होते. तो गेल्या दोन दिवसांपासून घरी आलाच नाही. दिनांक 15 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रूपाला येथे राहणारा राजू सुरोशे यांच्या मोबाईल वरून नारायण यांच्या भावास फोन आला की अंकुश च्या भावाला मारुती मंदिर उमरखेड समोरून कोणीतरी अज्ञात दोन ते तीन व्यक्तींनी गाडी जबरदस्ती टाकून नेले आहे.
सदर फोन नंतर मयत युवकाच्या भावाने मयत व्यक्तीस फोन द्वारे संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. सुद्धा घरच्या लोकांनी सदर मयत व्यक्ती संदर्भात विचारपूस करण्यासाठी फोन केला असता मुकडदम सोबत सुद्धा संपर्क होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी मयत व्यक्तीच्या भावाला इंदल राठोड (मुकदम) याचा फोन आला व सदर तुझा भाऊ माझ्या कडे आहे त्याच्यावर असलेले पन्नास हजार रुपये तू मला आणून दे आणि तुझ्या भावाला घेऊन जा.
घरी व्यक्ती सदर मुकडदमाचे पैसे परत करण्यास तयार झाले असताना सदर युवकाला दोन ते तीन दिवस दाबून ठेवत मारहाणी दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करून परिवारातील सदस्यांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथे सदर लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करून प्रेताचे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी केली.
सदर मयत व्यक्तीची शेव हे शासकीय रुग्णालय उमरखेड च्या आवारात ठेवत जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सदर वृत्तकाचे शेव विच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका परिवारातील व नातेवाईकातील सदस्यांनी घेतली असल्याने परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांचाळ साहेब हे करत आहेत.
मयत नंदकुमार काळे यांचा मृतदेह उप जिल्हा रुग्णालय उमरखेड येथे आणला असता सदर मुत्यदेहाचे शवविच्छेदन हे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय करावे अन्यथा सदर प्रेत आम्ही जागे वरून हलू देणार नाही अशी मागणी मुत्यकाच्या परिवारातील सदस्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली असता उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांनी मुत्यकाच्या परिवारासोबत दमदाटी केल्याचा आरोप परिवारातील सदस्यांकडून केला जात आहे.
-चौकट –
मस्साजोग ची पुनरावृत्ती उमरखेड तालुक्यात होऊ नये यासाठी प्रशासनाने निपक्षपाती कार्यवाही करावी -राहुल मोहितवार
मस्साजोग येतील सरपंच संतोष देशमुख यांची पैशाच्या वादातून (खंडणी) हत्या होऊन काही महिने उलटत नाही तर उमरखेड तालुक्यातील चुरमुरा या गावातील युवकाचा मारलेगाव येथे संशयास्पद मुत्यदेह आढळल्यामुळे सदर मृतक व्यक्तीच्या परिवारातील सदस्यांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे सदर मृतकाच्या पैशाच्या वादातून खून झाल्याची तक्रार उमरखेड पोलीस स्टेशन येथे दाखल केले असून सदर तक्रारीवर पोलीस प्रशासनाने निपक्षपाती चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी व बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख यांच्या हत्तेची पुनरावृत्ती उमरखेड तालुक्यात होऊ नये याकडे लक्ष देऊन मृतकाच्या परिवाराला न्याय द्यावा. असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी व्यक्त केले आहे.
Tech dae Very well presented. Every quote was awesome and thanks for sharing the content. Keep sharing and keep motivating others.
Mitolyn There is definately a lot to find out about this subject. I like all the points you made
Mitolyn naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.