राज्यस्तरीय समितीने दिली स्मार्ट ग्राम नागापुर ला भेट.

youtube

राज्यस्तरीय समितीने दिली स्मार्ट ग्राम नागापुर ला भेट
उमरखेड:-
राज्य शासनाच्या राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१८-२०१९ व सन२०१९-२०२० या दोन वर्षांकरिता घेण्यात आली यामध्ये *माजी जि.प.सदस्य चितांगराव कदम सर* यांच्या मार्गदर्शनाखाली नागापुर (प) गावाने सहभाग घेवुन अमरावती विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी पात्र ठरल्याने स्मार्टग्राम नागापुर(प) येथे राज्यस्तरीय तपासणी समितीने भेट देवुन गावाची पाहणी केली.या समितीमध्ये समितीचे अध्यक्ष पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे अवर सचिव चंद्रकातजी मोरे,समिती सदस्य पाणी पुरवठा व स्वछता विभाग मंत्रालयाचे कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे,सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे यांचा समावेश होता.या समितीच्या पदाधिकाऱ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने माजी जि.प.सदस्य चितांगराव कदम सर व माजी सभापती सौ.सविताताई कदम यांच्याहस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे, माजी पंचायत समिती सदस्य गजानन सोळंके, जिल्हा समन्वयक भारत चव्हाण,गट शिक्षणाधिकारी सतिश दर्शनवाड,विस्तार अधिकारी मुंडे,अमोल चव्हाण ,पांडुरंग माने, शिक्षण विस्तार अधिकारी खांडरे सर,तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बोंडे सर,सरकारी वकील नाईक साहेब,सरपंच रामा ठेंगे,उपसरपंच गोदाजीराव जाधव,पोलीस पाटील मारोती कदम,ग्रामसेवक गोरे साहेब,तलाठी कीर्ती माखने ,तालुका स्तरावरील प्रभारी गट समन्वयक गौतम चौरे,समुह समन्वयक गणेश अडाणे, कैलास वाहुळे,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष,सर्व ग्राम पंचायत सदस्य,पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी, शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “राज्यस्तरीय समितीने दिली स्मार्ट ग्राम नागापुर ला भेट.

  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!