लाखो रुपये खर्ची करून सुद्धा तलाठी कार्यालय धुळखात.

youtube

लाखो रुपये खर्ची करून सुद्धा तलाठी कार्यालय धुळखात!

प्रतिनिधी :

उमरखेड: महसूल प्रशासन आणि शेतकरी यांच्यामधील महत्त्वपूर्ण दुवा मानल्या जाणाऱ्या तलाठ्यांना त्यांच्या कर्तव्यावरील गावातच अगदी चोखपणे कर्तव्य बजावता यावे व यातून नागरिकांना आपापल्या गावातच तलाठ्याकडील कामे करून घेता यावीत म्हणून तात्कालीन सरकारने प्रत्येक महसुली साज्याला सुसज्ज असे एक तलाठी कार्यालय बांधून देण्याचे ठरविले होते यातील बहुतांश तलाठी कार्यालय ही पूर्णपणे कार्यालयीन कामकाजासाठी सुसज्ज झाली असून प्रशासनाच्या ढिसाळ व उदासीन धोरणामुळे मोठ्या प्रमाणात निधी खर्ची घालून बांधलेली तलाठी कार्यालय अद्यापही धुळखात पडली असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत असून यातून संबंधित गावावर कर्तव्य बजाविणाऱ्या तलाठ्यांना व तलाठ्याकडे कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे सुसज्ज असे तलाठी कार्यालय रंगरंगोटीसह पूर्णत्वास जाऊनही महसूल प्रशासन या इमारती आपल्या ताब्यात का घेत नाही याबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला असल्याचे दिसत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!