ठोस आश्वासनाने टाकळीवासीयांच्या उपोषणाची सांगता.
ठोस आश्वासनाने टाकळीवासीयांच्या उपोषणाची सांगता
उमरखेड : –
टाकळी ( रा . ) ते उमरखेड रस्त्याचे काम त्वरीत सुरु करून गावकऱ्यांना जिवघेण्या खडतर रस्त्याच्या कचाट्यातून मुक्त करावे या मागणीसाठी सुरु केलेल्या उपोषणाची आज चौथ्या दिवशी यशस्वी सांगता झाली . उमरखेड ते टाकळी (राजापूर ) या 8 किलोमिटर रस्त्याचे मजबुत डांबरी करणाचे काम येत्या 14 नोव्हेंबर पर्यन्त पूर्ण करण्यात येईल असे ठोस आश्वासन भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांच्याशी मोबाईलवरून गावकऱ्यां सोबत संवाद साधल्यानंतर आमदार नामदेव ससाणे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता तोडे , कुरेशी , जि . प . बांधकाम विभागाचे विवेक जोशी ‘ तहसिलदार यांनी शंभर रुपयाच्या स्टँप पेपरवर शपथपत्र दिल्यानंतर उपोषण कर्त्यांचे व गावकऱ्यांचे समाधान झाले दुपारी 3 वाजताचे दरम्यान उपोषण कर्त्यांना लिंबू शरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली व गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले . चार दिवसांपासून टाकळी (रा . ) येथील आबाल वृद्ध उपोषण आंदोलनात निर्धाराने सहभागी झाले होते . त्यांच्या या आंदोलनाला शिवसेना , काँग्रेस , वकील संघटना, जिजाऊ ब्रिगेड यांनी पाठिंबा दिला होता . यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सरोज देशमुख यांच्यासह भाजपाचे बळवंतराव नाईक , सुदर्शन रावते , बेदरकर आदि पदाधिकारी उपस्थित होते .
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://accounts.binance.com/fr/register-person?ref=GJY4VW8W
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://www.binance.info/ph/join?ref=PORL8W0Z
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks. nimabi
Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.