आंबेडकरी चळवळीतील विचारवंत योध्दा हरवला.

– डॉ. प्रेम हनवते
ऍड.विमलसूर्य चिमणकर यांना श्रद्धांजली
उमरखेड…(प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे मार्शल ऍड. विमलसूर्य चिमणकर यांचे काल दुःखद निधन झाले. आज सुमेध बोधी विहार समिती तर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी बोलतांना डॉ. प्रेम हनवते म्हणाले की, “विमल सूर्य चिमणकर यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून शिस्तबद आंबेडकरी विचारांचे तरुणपिढी निर्माण करण्याचे कार्य केले.त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील विचारवंत योध्दा हरवला आहे. आंबेडकरी चळवळी भाष्यकार म्हणून ओळखले जाणारे मार्शल चिमनकर हे
देशात ज्या मोजक्या लोकांना आंबेडकरी विचार अचूक समजला आहे, ज्यांना आंबेडकरी आंदोलनाची योग्य दिशा माहीत होती अशातले एक नाव एड.विमलसूर्य चिमणकर! ज्या माणसाने कधीही आपली मूल्य सोडली नाहीत, विचारधारा सोडली नाही. कुणाची लाचारी केली नाही. आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद ते सहज मिळवू शकले असते.पण.. आयुष्यभर आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक राहिले.समता सैनिक दलाचे प्रमुख, गेल्या पन्नास वर्षांतील अनेक आंदोलनाचे साक्षीदार! अतिशय महत्वाचे पुस्तक त्यांनी लिहायला घेतले होते! अनेक आजार, शरीराला अर्धांवायूचा आघात झालेला… तरीही सतत काम करत राहणार झंझावात अखेर थांबला.”
या कार्यक्रमाचे अध्यक्षतस्थानी विहार समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल काळबांडे हे होते तर भीमराव सोनूले, राहुल काळबांडे ,साहेबराव कांबळे वसंतराव भरणे ,संतोषराव निथळे,विरेंद्र खंदारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होते. प्रा. गजानन दामोदर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
281 thoughts on “आंबेडकरी चळवळीतील विचारवंत योध्दा हरवला.”