काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा आवारी यांचा उमरखेड दौरा.
काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा आवारी यांचा उमरखेड दौरा
उमरखेड:
नवनियुक्त काँग्रेसच्या महिला जिल्हाधक्ष्या वंदना आवारी ह्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असतांना उमरखेड येथे भेट देऊन येथील महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये पक्ष्याचे महिला संघटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली त्याच प्रमाणे सध्या केंद्र सरकार पुरस्कृत महागाईमुळे महिलांचे कंबरडे मोडलेले असताना,वाढलेल्या महागाईचा सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागत असल्याने महिलांनी ह्या विषयावर समोर आले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या बैठकीमध्ये महिला जिल्हाध्यक्ष यांनी समोर होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद या निवडणुकीमध्ये महिलांचा पुढाकारा विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी संध्याताई बोबडे, रक्षा माने, शारदा सुरोशे, मनीषा कराळे, मीरा घुगरे, स्वाती खंदारे, वंदना घाडगे इ महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
तसेच मा आ विजयराव खडसे, महराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख,जिल्हा सरचिटणीस गोपाल अग्रवाल,पुरुषोत्तम आवारी,भैया पवार,शिकारे सर,अशोक घुगरे, इ काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.